लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जम्मू काश्मिरमधील कठुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि सुरत येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वात सर्वधर्मीय समाज बांधवांचा मोर्चा शुक्रवारी येथील जिल्हा कचेरीवर धडकला. रणरणत्या उन्हात मुली, महिलांसह हजारो नागरिक या निषेध मोर्चात सहभागी झाले होते.येथील पाटीपुरा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून शुक्रवारी दुपारी २.३० हा निषेध मोर्चा काढण्यात आला. हातात फलक घेतलेले हजारो नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या अग्रभागी हातात निषेधाचे बॅनर घेतलेल्या चिमुकल्या मुली, त्या मागे महिला होत्या. निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा शहरातील विविध मार्गांनी मार्गक्रमक करीत येथील तिरंगा चौकात पोहोचला. तेथे मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. त्या ठिकाणी बसपाचे जिल्हाध्यक्ष तथा मोर्चाचे संयोजक मो. तारीक साहीर लोखंडवाला, मुफ्ती एजाज, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले, अली इम्रान, निजामोद्दीन, मौलवी शारीक आदींसह विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मोर्चातील एका शिष्टमंडळाने महामहीम राष्ट्रपतींच्या नावाने असलेली निवेदनाची प्रत जिल्हाधिकाºयांकडे सादर केली.
कठुआ घटनेच्या निषेधार्थ जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:11 IST
जम्मू काश्मिरमधील कठुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि सुरत येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वात सर्वधर्मीय समाज बांधवांचा मोर्चा शुक्रवारी येथील जिल्हा कचेरीवर धडकला.
कठुआ घटनेच्या निषेधार्थ जिल्हा कचेरीवर मोर्चा
ठळक मुद्देबसपाचे आयोजन : नागरिकांचा मोठा सहभाग