शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

जिल्हा बँक कर्मचारी संघटनेत फुटीचा डाव

By admin | Updated: August 22, 2015 02:33 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लाभातून सोडविले जाणारे संचालकांच्या ‘मार्जीन मनी’चे गणित डोळ््यापुढे ठेऊन या कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव रचला जात आहे.

पतसंस्थेचे अध्यक्षपद : वेतनवाढ, बोनसमधील ‘मार्जीन मनी’चे गणितयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लाभातून सोडविले जाणारे संचालकांच्या ‘मार्जीन मनी’चे गणित डोळ््यापुढे ठेऊन या कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव रचला जात आहे. जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा भत्ते, वेतनवाढ, बोनस असे लाभ दिले जातात. हे लाभ जुन्या तारखेत लागू केले जातात. मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हाती चालू तारखेपासूनचे लाभ देऊन जुन्या तारखेचे लाभार्थी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातील अनेक सदस्य होतात असाच आजपर्यंतचा अलिकडच्या काळातील बहुतांश अनुभव आहे. कर्मचाऱ्यांच्या लाभातील ‘मार्जीन मनी’चा वाटा मिळावा म्हणून हे कर्मचारी एकत्र येऊ नये, त्यांच्यात कायम फूट रहावी, असा प्रयत्न संचालकांकडून केला जातो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक २०० कोटी रुपयांची उलाढाल आहे. या पतसंस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे कर्मचारी पुन्हा एकजूट होण्याची शक्यता आहे. ते पाहून काही संचालकांना जणू हूरहूर लागली आहे. हे कर्मचारी एकत्र आल्यास आपल्या ‘मार्जीन मनी’चे कसे याची चिंता या संचालकांना भेडसावते आहे. म्हणूनच त्यांनी हे कर्मचारी एकत्र येणार नाही, या दृष्टीने प्रयत्न चालविले आहे.बँकेच्या कर्मचारी पतसंस्थेच्या १५ संचालक पदासाठी निवडणूक झाली. त्यातील एक संचालक अविरोध निवडून आले. या संचालकासह नऊ जागा सहकार पॅनलने तर सहा जागा सहयोग पॅनलने पटकाविल्या. या पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. त्याचा कार्यक्रम जारी होण्याची प्रतीक्षा आहे. आॅगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. संचालकांच्या निवडीत एकमेकांच्या विरोधात लढलेले कर्मचाऱ्यांचे पॅनल एकत्र येऊन सर्वसंमतीने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडण्याच्या मानसिकतेत आला आहे. मात्र ही एकजूट होऊ नये म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळातून सूत्रे हलविली जात असल्याची माहिती आहे. त्यामागे ‘मार्जीन मनी’ हा छुपा स्वार्थ आहे. कर्मचारी भांडत रहावे, त्यांच्या दोन संघटना सक्रिय रहाव्या, असा प्रयत्न आहे. एकजूट झाल्यास ते संचालकांच्या विरोधात जाण्याची भीती आहे. म्हणूनच त्यांच्यात भांडणे व दोन गट राहिल्यास कोणत्याही एका गटाला जवळ घेऊन आपला स्वार्थ साधता येईल, असा जिल्हा बँक संचालकांचा मनसुबा आहे. या पतसंस्थेच्या अध्यक्षपदासाठी दोनही पॅनलकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. जिल्हा बँकेच्या एका संचालकानेसुद्धा आपल्या नातेवाईकाच्या गळ्यात पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची माळ घालता येते का या दृष्टीने चाचपणी चालविली आहे. पतसंस्थेच्या एका पॅनलचे प्रमुख जिल्हा बँक अध्यक्षांच्या मर्जीतील असल्याचे बोलले जाते. विशेष असे पॅनलच्या या प्रमुखांना तांत्रिक ज्ञान असले तरी पतसंस्थेच्या मतदार यादीत त्यांचे नाव नाही. त्यांना हाताशी धरुनच जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न संचालक स्तरावरून केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)