शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

दारव्हा येथे लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेचे बक्षीस वितरण

By admin | Updated: February 12, 2016 03:05 IST

लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे नगरपरिषद मराठी शाळा क्र.२ येथे घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

नगरपरिषद शाळा : श्लोक तोटे ठरला पहिल्या बक्षिसाचा मानकरीदारव्हा : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे नगरपरिषद मराठी शाळा क्र.२ येथे घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोक चिरडे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष माधुरी गडपायले, शिक्षण सभापती इंगोले, नगरसेविका आशाताई डोंगरे, संगीता म्हातारमारे, गीता उरकुडे, बंडू डोंगरे, प्रकाश उरकुडे, प्रशासन अधिकारी व्यवहारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर गावंडे, सदस्य सखाराम चिंतकुटलावार, विजय डांगरा, मुख्याध्यापक रमेश राठोड आदी उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये श्लोक विनोद तोटे याने प्रथम क्रमांकाचे हेलिकॉप्टर बक्षीस पटकावले. दुसऱ्या क्रमांकाचे वालकार बक्षीस तिसरीचा विद्यार्थी पार्थ ज्ञानेश्वर दुधे तर तिसऱ्या क्रमांकाचे टिफीन बॉक्स बक्षीस सहावीतील विद्यार्थिनी साक्षी शालिक खंडारे हिने पटकावले. अनुष्का शंकर सरागे, वेदांती सचिन निमकर, साक्षी सुरेश नारनवरे, ओम दीपक तरटे, गायत्री नामदेव राठोड, नंदिनी संजय सावळकर, श्रृती अरुण ठाकरे, पराग प्रवीणकुमार निनावे व धनश्री सामेश्वर पंचबुद्धे आदींनी प्रोत्साहनपर बक्षिसे पटकावली. या सर्व बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाची स्तुती केली. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण होते व स्पर्धेच्या निमित्ताने जिद्द चिकाटीसोबतच त्यांच्या ज्ञानात भर पडते. हे सर्व परीक्षेच्या काळात व भविष्यासाठी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल कोषटवार व राकेश मडावी यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश राठोड यांनी केले. आभार जगताप यांनी मानले. यशस्वीतेसाठी नगरपरिषद मराठी शाळा क्र.२ चे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका व नगरपरिषद शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)