शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

वादळाचा वितरणला अडीच कोटींचा फटका

By admin | Updated: May 9, 2016 02:22 IST

जिल्ह्यात सलग तीन दिवस घोंगावणाऱ्या वादळाचा शेकडो घरांसोबतच वीज वितरणलाही मोठा फटका बसला.

११९६ खांब आडवे : ८५ किलोमीटर वीज तारा तुटल्या यवतमाळ : जिल्ह्यात सलग तीन दिवस घोंगावणाऱ्या वादळाचा शेकडो घरांसोबतच वीज वितरणलाही मोठा फटका बसला. वादळात वीज वितरण कंपनीचे ११९६ खांब आडवे झाले असून ठिकठिकाणी कोसळलेल्या वृक्षांमुळे तब्बल ८५ किलोमीटरच्या तारा तुटुन पडल्या. परिणामी वीज पुरवठा खंडित झाला असून त्याचा फटका पाणीपुरवठा योजना आणि कृषिपंपांना बसला. तसेच अनेक गावे आजही अंधारात आहे. जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून वादळी वातावरण आहे. या वादळाचा अनेक गावांना फटका बसला. अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. तसेच फळबागांनाही त्याचा तडाखा बसला. यासोबतच वीज वितरण कंपनीच्या वीज तारा आणि खांबांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात तब्बल २ कोटी ३६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वीज वितरण कंपनीने व्यक्त केला आहे. गावागावांतील वीज तारा तुटल्याने अनेक गावे अंधारात आहे. यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद उपविभागातील गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. यासोबतच वीज पुरवठा खंडित असल्याने अनेक गावातील नळ योजना प्रभावित झाल्या आहेत. कृषिपंपाचा वीज पुरवठाही खंडित झाला आहे. वादळामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले. हे वृक्ष वीज तारांवर पडल्याने तारा तुटल्या. तसेच खांब वाकले आहे. वादळाचा वेग एवढा प्रचंड होता की लघुदाब वाहिनीसोबत उच्चदाब वाहिनीचे खांबही तुटून पडले आहे. सध्या वीज जोडणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. वादळात यवतमाळ विभागात वीज वितरणचे १ कोटी ४ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले. उच्चदाब वाहिनीचे १२६ तर लघुदाब वाहिनीचे ४७३ खांब तुटून पडले. ४४ किलोमीटरची तार तुटली आहे. पांढरकवडा उपविभागात ३५ लाखांचे नुकसान झाले असून उच्चदाब वाहिनीचे ४४ आणि लघु दाब वाहिनीची ११५ खांब तुटले आहे. पुसद उपविभागात वीज वितरण कंपनीचे ९७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ३३ किलोमीटर तारा तुटल्या आहे. लघुदाब वाहिनीचे ३४० तर उच्चदाब वाहिनीचे ९० खांब तुटले आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून अद्यापही काही गावे अंधारात आहे. (शहर वार्ताहर)