शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीसाठी नवऱ्याला सोडचिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:04 IST

नोकरी करणारी महिला म्हणजे मानाचा विषय झाला आहे. मात्र यातीलच काही महिला नोकरी टिकविण्यासाठी, बदली टाळण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. काही परिचारिकांनी तर ‘नोकरीचे गाव बदलू नये’ म्हणून चक्क नवºयाला कागदोपत्री सोडचिठ्ठी दिली आहे.

ठळक मुद्देपरिचारिकांचा प्रताप : आरोग्य विभागाच्या बदल्यांवर संघटनेचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नोकरी करणारी महिला म्हणजे मानाचा विषय झाला आहे. मात्र यातीलच काही महिला नोकरी टिकविण्यासाठी, बदली टाळण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. काही परिचारिकांनी तर ‘नोकरीचे गाव बदलू नये’ म्हणून चक्क नवºयाला कागदोपत्री सोडचिठ्ठी दिली आहे. तर याच परिचारिकांच्या स्पर्धक परिचारिकांनी त्यांचा सख्खा नवरा प्रशासनाला नावानिशी दाखवून दिला आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागातील बदली प्रक्रिया दरवर्षीच वादग्रस्त ठरते. यंदाची प्रक्रियाही अपवाद नाही. २ जून रोजी सीईओंच्या पुढे समुपदेशनाने बदल्या होणार आहे. तत्पूर्वी बदलीतून सूट मिळविण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी, विशेषत: महिला कर्मचाºयांनी विविध प्रमाणपत्रे सादर केली आहे. मात्र ही प्रमाणपत्रेच बनावट असल्याचा प्रकार पुढे आला आहे. विशेष म्हणजे ही बनवाबनवी दुसरे-तिसरे कोणी नव्हे तर या कर्मचाºयांच्या युनियननेच उघड केली आहे.महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी युनियनने याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सविस्तर पत्र दिले आहे. विभाग प्रमुखांनी तयार केलेल्या यादीत अनेक त्रुटी असून त्या शेवटपर्यंत दुरुस्तच केल्या जात नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी न्यायालयात जातात. बदलीतून सूट मिळविण्यासाठी अनेक कर्मचाºयांनी बनावट प्रमाणपत्रे जोडली आहे. त्यांची योग्य तपासणी करण्याची मागणी युनियनने केली आहे. मागील वर्षी नक्षलग्रस्त, आदिवासी भागातील बदल्या प्रथम करण्यात आल्या. त्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रातील कर्मचाºयांच्या बदल्या कमी झाल्या. यावर्षी प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबविण्यापूर्वी सर्व कागदपत्रे कसून तपासावी, नक्षलग्रस्त आणि सर्वसाधारण क्षेत्रातील बदल्यांची टक्केवारी सारखी ठेवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.घाटंजी, राळेगावातील दिले पुरावेघाटंजी तालुक्यातील एका महिला कर्मचाºयाने बदलीत सूट मिळविण्यासाठी स्वत:ला गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचे प्रमाणपत्र जोडले आहे. प्रत्यक्षात त्यांचे गर्भाशय यापूर्वीच काढून टाकल्याची माहिती सीईओंना स्पर्धक कर्मचाºयांनी दिली आहे. राळेगाव तालुक्यातील महिला कर्मचाºयाने आपण घटस्फोटित असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केले आहे. तर यवतमाळ तालुक्यातील एका महिला कर्मचाºयानेही हाच प्रकार केला. मात्र या दोघींचेही पती कायम असून जिल्ह्यातच शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे पुरावे स्पर्धक महिला कर्मचाºयांनी सीईओंना दिले आहे. यासह अनेक महिला कर्मचाºयांच्या कागदपत्रांबाबत संशय असून त्याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली