लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पाच तालुक्यांची कामधेनू असलेला वसंत सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या नाकर्तेपणाने आणि गैरकारभाराने बंद पडला. ऊस उत्पादक आणि कामगार देशोधडीला लागले आहे. या प्रकरणी चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करताना करण्यात आली.उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना यंदा अद्यापही सुरू झाला नाही. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. इतर कारखाने शेतकºयांची पिळवणूक करीत आहे. कारखाना सुरू न झाल्याने कामगार देशोधडीला लागले असून ३० महिन्यांपासून वेतन थकीत आहे. या सर्व प्रकाराला संचालक मंडळ जबाबदार असल्याचा आरोप करीत बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. संचालक मंडळाच्या गैरकारभाराची चौकशी साखर आयुक्तांनी करावी, तसेच पुढील गळीत हंगामात कारखाना सुरू करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहे.यावेळी ऊस उत्पादक संघाचे तातेराव चव्हाण, बंशीलाल शर्मा, प्रदीप देवसरकर, भीमराव चंद्रवंशी, बळवंत चव्हाण, विलास चव्हाण, डॉ.गणेश घोडेकर, पंडित पांगारकर, उत्तम जाधव, भैया पवार, पंडित देशमुख, युवराज बंडगर, सूर्यकांत पंडित यांच्यासह ऊस उत्पादक आणि कामगार सहभागी झाले होते.या आंदोलनादरम्यान रिपाइंचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे आणि माजी आमदार विजय खडसे यांनी भेट देवून पाठिंबा दर्शविला आहे.
‘वसंत’चे संचालक मंडळ बरखास्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:31 IST
पाच तालुक्यांची कामधेनू असलेला वसंत सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या नाकर्तेपणाने आणि गैरकारभाराने बंद पडला. ऊस उत्पादक आणि कामगार देशोधडीला लागले आहे.
‘वसंत’चे संचालक मंडळ बरखास्त करा
ठळक मुद्देएसडीओपुढे धरणे : ऊस उत्पादक, कामगार देशोधडीला, कारखाना बंदच