शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ शहरात निर्जंतुकीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

यवतमाळ नगरपरिषदेने मिनी फायर असलेल्या अग्निशमन बंबात सोडीयम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार केले आहे. हे मिश्रण थेट परिसरात फवारले जात आहे. विशेष करून ज्या भागातील कोरोना संशयित रुग्ण मिळाले, कोरोनाग्रस्त आहेत अशा परिसरात नियमित फवारणी केली जाणार आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संसर्ग प्रतिबंधक वॉर्ड परिसरातही अग्निशमन बंबाच्या सहाय्याने निर्जंतुकीकरणासाठी सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली.

ठळक मुद्देनगरपरिषदेचा उपक्रम : आरोग्य विभाग झाला सक्रिय, अग्निशमन बंबाद्वारे सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. यवतमाळातही कोरोनाबाधित रुग्ण मिळाले आहे. संशयित रुग्णही वाढत आहे. अशा स्थितीत शहरातील सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगरपालिकेने फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. हातपंपाचा वापर मर्यादित होत असल्याने अग्निशमन बंबाच्या सहाय्याने फवारणी केली जात आहे. खुद्द मुख्याधिकाऱ्यांच्या देखरेखीत हे काम सुरू आहे.यवतमाळ नगरपरिषदेने मिनी फायर असलेल्या अग्निशमन बंबात सोडीयम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार केले आहे. हे मिश्रण थेट परिसरात फवारले जात आहे. विशेष करून ज्या भागातील कोरोना संशयित रुग्ण मिळाले, कोरोनाग्रस्त आहेत अशा परिसरात नियमित फवारणी केली जाणार आहे.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संसर्ग प्रतिबंधक वॉर्ड परिसरातही अग्निशमन बंबाच्या सहाय्याने निर्जंतुकीकरणासाठी सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. त्यानंतर गायत्री लॉनसमोरच्या चर्च रोडवर, राधिका ले-आऊट यासह सिव्हिल लाईन व शहराच्या गर्दीच्या काही ठिकाणी फवारणी करण्यात आली. सायंकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे फवारणीचे काम थांबवावे लागले.या व्यतिरिक्त प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांच्या नियंत्रणात हातपंपाने फवारणी सुरू आहे. नगरपालिकेचे २० हातपंप चार दिवसांपासून फवारणीचे काम करत आहे. ज्या भागात दाट लोकवस्ती व सतत घाण असते अशा परिसराला पहिल्यांदा निर्जंतुकीकरण करण्याचा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी शक्य त्या सर्वच उपाययोजना वरिष्ठ पातळीवरून येणाºया निर्देशानुसार राबविल्या जात आहे. या काळात नागरिकांकडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी कचरा इतरत्र न फेकता घंटागाडीतच टाकावा, घराच्या परिसरातही स्वच्छता ठेवावी, असे आवाहन केले.जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात फवारणीसध्या कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिपत्याखाली काम करत आहे. त्यामुळे येथील कार्यालयातही येणाºया-जाणाऱ्यांची वर्दळ पूर्वीपेक्षा अधिक झाली आहे. दक्षतेचा भाग म्हणून नगरपरिषद आरोग्य विभागाने थेट जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयात निर्जंतुकीकरणाची फवारणी केली. टप्प्याटप्प्याने शहरातील वर्दळीच्या व गर्दी होणाºया ठिकाणांवर पालिकेकडून फवारणी केली जाणार आहे. फवारणीचे शेड्यूल तयार केले असून नगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा यामध्ये लागली आहे. शहरात स्वच्छता व निर्जंतुकीकरण या दोन्ही प्रक्रिया सोबतच राबविण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या