शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

सभापती निवडी संदर्भात संचालकांची तीव्र नाराजी

By admin | Updated: August 15, 2015 02:35 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व विद्यमान आमदार यांनी सुचविलेल्या नावाला विरोध दर्शवून संचालकांनी...

आदेश झुगारला : कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक पुन्हा रद्दपुसद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व विद्यमान आमदार यांनी सुचविलेल्या नावाला विरोध दर्शवून संचालकांनी सभापती निवडीच्या बैठकीला खो दिल्याने कोरम अभावी अखेरिस बैठक विसर्जित करावी लागली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या रिक्त जागेवर नवीन संचालकाची निवड तसेच सभापती पदाच्या निवडीसाठी जिल्हा सहाय्यक निबंधकाकडून १४ आॅगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आमदार मनोहर नाईक यांनी बाजार समितीला भेट दिली. यावेळी त्यांनी परिसरातील अतिक्रमण केलेल्या दुकानांची पाहणी केली. त्यांच्यासोबत पुसद जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष विजय चव्हान, यवतमाळ जिल्हा बँकेचे रिजनल अध्यक्ष आर.डी.राठोड होते. संचालक व सभापती पदासाठी नाईक यांनी एक नाव सुचविले होते. तसा निरोप सर्व संचालकांना कळविण्यात आला. निवडीसाठी बैठक बारा वाजताच्या सुमारास सुरू झाली. सहाय्यक निबंधक जी.एन.नाईक यांच्या अध्यक्षतेत बैठक सुरू झाली. या बैठकीला बाजार समितीच्या १४ संचालकांपैकी केवळ तीन संचालक उपस्थित होते. अखेर सभाअध्यक्षांनी कोरमअभावी सभा तहकूब केली. उल्लेखनिय म्हणजे निवड बैठक तहकूब केली त्यावेळी बाजार समितीच्या परिसरात आठ ते दहा संचालक उपस्थित होते. परंतु त्यांनी एकप्रकारे नेत्यांनी सुचविलेल्या नावाला विरोध दर्शवित बैठकीवर बहिष्कार टाकला. याबाबत सदर प्रतिनिधीने बाजार समितीच्या उपसभापती आणि सहसंचालकांना याबाबत विचारणा केली असता प्रत्येकजण कोरमअभावी सभा तहकूब केल्याचेच सांगत होता. यावेळी समिती सचिवाच्या कक्षात उपसभापतींसह सहा संचालक उपस्थित होते. तर तीन संचालक कार्यालय परिसरात होते. बैठकीला तीन सदस्य कोण हजर होते, त्यांची नावे सांगण्यास कुणीही तयार नव्हते. अखेर एका संचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर आमचे नेते आमदार नाईक यांनी दिलीप बेंडे पाटील यांचे नाव सुचविल्याचा निरोप विजय चव्हाण व आर.डी. राठोड यांच्यामार्फत पाठविला. संचालकपदी बेंडे पाटलांच्या नावाला आमचा विरोध नव्हता, परंतु एका नव्या संचालकाला तत्काळ सभापती पदावर आरुढ करण्यासाठी संचालकांचा विरोध होता. सभापती हा जुन्या संचालकांपैकी झाला पाहिजे, असा आमचा आग्रह होता, असे हा संचालक म्हणाला. त्या अनुषंगाने १४ संचालकांपैकी विठ्ठल राठोड, बळीराम चव्हान व चंद्रशेखर नाईक हे तिघेच सभेला उपस्थित होते. एक संचालक या बैठकीसाठी नागपूर येथून स्वत:चे काम बाजूला सारून आले होते तर एक संचालक नांदेडचा दौरा सोडून उपस्थित होते. परंतु बैठक न झाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. यापूर्वी सहा आॅगस्टला संचालक व सभापती निवडीची सभा निर्धारित करण्यात आली होती. आता नवीन तारखेच्या प्रतिक्षेत सर्वजण आहेत. सहकार क्षेत्रात किमान तालुक्यात तरी आजवर मनोहर नाईक यांचा शब्द पडत नव्हता. परंतु आजच्या बैठकीत भाऊंनी सुचविलेल्या नावाला विरोध झाला, ही चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे. संचालकांनी आमदार मनोहर नाईक यांनी सुचविलेल्या नावाला विरोध दर्शवून सभेवर सामूहिक बहिष्कार टाकला. याचा अर्थ भाऊंचा प्रभाव ओसरत तर चालला नाही ना, असा सूर सर्वसामान्यांमधून उमटू लागला आहे. (तालुका प्रतिनिधी)