शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी नगरसेवकांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 21:19 IST

येथील नगरपरिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून विरोधी भाजपा व शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला. अन्यायकारक मालमत्ता करवाढीविरुद्ध संताप व्यक्त करून विरोधी नगरसेवकांनी बाहेरचा रस्ता धरला.

ठळक मुद्देपुसद नगरपरिषद : सत्ताधाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी, करवाढ अन्यायकारक

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील नगरपरिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून विरोधी भाजपा व शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला. अन्यायकारक मालमत्ता करवाढीविरुद्ध संताप व्यक्त करून विरोधी नगरसेवकांनी बाहेरचा रस्ता धरला.नगरपरिषदेने २०१८-१९ ते २०२२-२३ या चार वर्षांसाठी मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तब्बल तीन ते चारपट मालमत्ता कर वाढवून नागरिकांना वेठीस धरले. ही करवाढ अन्यायकारक असल्याचा आरोप करीत विरोधी भाजप आणि शिवसेना नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला. त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा निषेध नोंदविला.पालिकेने आगामी चार वर्षांसाठी मालमत्ता करवाढ करताना नागरिकांचा विचार केला नाही. करवाढीसाठी जानेवारीमध्ये सभा झाली होती. त्यात विरोधकांनी केवळ दहा ते १५ टक्के करवाढ करण्याची सूचना केली होती. मात्र प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांनी ३० टक्के करवाढ करून जनतेवर अन्याय केल्याचा आरोप भाजपा गटनेते निखिल चिद्दरवार यांनी केला. भरमसाठ मालमत्ता करवाढीचे सूचनापत्र नागरिकांपर्यंत पोहोचल्याने आता त्यांच्यातही संताप व्यक्त केला जात आहे.प्रस्तावित करवाढीवर आक्षेप नोंदविण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहे. बुधवार ही आक्षेपासाठी शेवटचा दिवस होता. तब्बल १५ हजारांवर नागरिकांनी आक्षेप नोंदविल्याची माहिती आहे. या वाढीविरोधात गुरुवारी विरोधकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून संताप व्यक्त केला. पालिका सभागृहाबाहेर विरोधकांनी करवाढीविरोधात प्रचंड घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.विशेष सभेची मागणीविरोधकांनी गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत विशेष सभा बोलावून करवाढ कमी करण्याबाबत चर्चा करण्याची मागणी केली. निखिल चिद्दरवार, निळकंठ पाटील, निरज पवार, उमाकांत पापीनवार आदींनी विशेष सभेची मागणी रेटून धरली. मात्र त्याला मंजुरी मिळत नसल्याचे दिसताच विरोधी भाजपा व शिवसेना नगरसेवकांनी सत्ताधाºयांचा निषेध नोंदवून घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाYavatmalयवतमाळ