शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागातील पाच अधिकाऱ्यांचे अपंगत्व ‘डाउटफुल’

By अविनाश साबापुरे | Updated: June 20, 2024 23:43 IST

आयुक्तांनी दिले तपासणीचे आदेश : बोगस प्रमाणपत्राद्वारे बढती मिळविल्याचा संशय

यवतमाळ : बदली प्रक्रियेत बोगस अपंगत्वाचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांचा मुद्दा दरवर्षी ऐरणीवर येतो. परंतु, आता चक्क शिक्षण विभागातील पाच बड्या अधिकाऱ्यांनीच पदोन्नतीसाठी बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या अधिकाऱ्यांच्या अपंगत्वावर खुद्द शिक्षण आयुक्तालयालाच संशय असून आयुक्तांनी या पाचही अधिकाऱ्यांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य शासनाने २९ डिसेंबर २०२२ रोजी राज्यातील १०५ अधिकाऱ्यांना उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गात पदोन्नती दिली. त्यामुळे हे अधिकारी जिल्हा तांत्रिक सेवा गट क श्रेणी-२ (शिक्षण) मधून महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब (प्रशासन शाखा) या संवर्गात पदोन्नत झाले. ४७६००-१५११०० या वेतनश्रेणीसाठी ते पात्र ठरले. परंतु, यातील पाच अधिकाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे पदोन्नती मिळविल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली. या दिव्यांग अधिकाऱ्यांची शहानिशा करुनच पुढील कार्यवाही करावी, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने थेट शिक्षण सचिवांकडे केली. त्यामुळे सूत्रे हलली. या अधिकाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींची तपासणी आयुक्त कार्यालयामार्फत होत असल्याने संघटनेची तक्रार सचिवांकडून आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचली. त्यामुळे आयुक्त कार्यालयाने १८ जून रोजी संबंधित शिक्षण उपसंचालकांना आदेश बजावून दिव्यांग अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. 

३० दिवसात अहवाल द्याया पाचही दिव्यांग अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि यूडीआयडी प्रमाणपत्रही नाही, असा आक्षेप आयुक्तालयाच्या आदेशात नमूद आहे. त्यामुळे त्यांनी पदोन्नतीसाठी सादर केलेल्या प्रमाणपत्राची शासकीय रुग्णालयाकडून पुनर्तपासणी करुण घ्यावी. त्याबाबतचा अहवाल ३० दिवसात सादर करावा, असे निर्देश शिक्षण आयुक्तालयाच्या प्रशासन अधिकारी रजनी रावडे यांनी शिक्षण उपसंचालकांना पाठविलेल्या आदेशात दिले आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि अमरावती शिक्षण उपसंचालकांसह माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांवर या अहवालाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोण आहेत हे अधिकारी?बोगस अपंगत्वाचा लाभ घेतल्याचा आक्षेप असलेल्या पाच अधिकाऱ्यांपैकी एक जण बुलडाणा जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी आहेत. एक जण जालना जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी आहेत. तर तिसरे अधिकारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये तर चौथे अधिकारी लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये गटशिक्षणाधिकारी आहेत. तर एक महिला अधिकारी पुणे येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात सहायक सचिव म्हणून कार्यरत आहेत. या पाच जणांच्या प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित झाली आहे. पुनर्तपासणी अहवालानंतरच त्यांचा खरेखोटेपणा स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षण