शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातील तरुणावर संचालकांचे एकमत

By admin | Updated: June 8, 2017 00:28 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या प्रभारी अध्यक्षपदासाठी भाजपाच्या पठडीतील तरुण संचालकाच्या नावावर

जिल्हा मध्यवर्ती बँक : प्रभारी अध्यक्ष निवड, सर्वपक्षीय नेत्यांची आज बैठक लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या प्रभारी अध्यक्षपदासाठी भाजपाच्या पठडीतील तरुण संचालकाच्या नावावर बँकेतील बहुतांश संचालकांचे एकमत झाल्याची माहिती आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील प्रमुख सर्वपक्षीय नेत्यांची संयुक्त बैठक होत असून त्यात या तरुण नेत्याच्या नावावर मोहोर उमटण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आज पार पडली. बँकेशी संबंधित नियमित पीककर्ज वाटप, थकबाकीदार, वसुली व अन्य काही मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. याशिवाय बँकेचे नवे प्रभारी अध्यक्ष कोण? यावरही संचालकांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. चर्चेतील उमेदवारांची नावे, त्यांचे कौशल्य, मेरीट यावरही खल झाला. अखेर सरकारचा पाठिंबा मिळविणे, सर्वांना सोबत घेऊन चालणारा उमेदवार देणे यावर चर्चेचा फोकस होता. गेल्या आठ-दहा वर्षात बँकेची बिघडलेली घडी निट बसविणे, बँकेच्या नफ्यात वाढ करणे, ४५ टक्क्यांच्या पुढे गेलेला बँकेचा एनपीए (बुडीत कर्ज) नियंत्रणात आणणे, चुकीच्या कर्जप्रकरणांना ब्रेक लावणे, बँकेची प्रगती साधणे आदी अपेक्षा संचालकांना नव्या प्रभारी अध्यक्षांकडून राहणार आहे. या सर्व अपेक्षापूर्तीसाठी भाजपातील एका तरुण संचालकाच्या नावावर चर्चा झाली आणि काही तासांच्या चर्चेनंतर त्यावर एकमतही झाले. आता गुरुवारी सायंकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना या प्रमुख पक्षांच्या नेत्यांची सायंकाळी बैठक होत आहे. त्यात संचालकांनी एकजुटीने पुढे केलेल्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसे न झाल्यास संचालकांची नेत्यांविरुद्ध बंडाचीही तयारी असल्याची माहिती आहे. नेत्यांच्या उमेदवाराला बँकेत तीन वेळा ‘धक्का’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नेत्यांनी सुचविलेला उमेदवार पाडण्याचे कसब संचालकांनी यापूर्वी तीन वेळा दाखविले होते. ते पाहता यावेळी नेतेमंडळी संचालकांना अव्हेरून स्वत:चा वेगळा उमेदवार देण्याची चूक करणार नाही, असा सहकार क्षेत्रातील सूर आहे. ही चूक झाल्यास नेत्यांच्या उमेदवाराला बँकेत आता चौथ्यांदा धक्का देण्याची तयारीही संचालकांनी केल्याची माहिती आहे.