नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : अमेरीकेतील एका मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून देवधरी येथील अच्युत चोपडे या युवकाने थेट चित्रपटसृष्टीत पाय रोवले. ‘लोकमत’ने पांढरकवडा येथे त्याची मुलाखत घेऊन मांडलेला हा त्याचा जीवनपट अनेकांना प्रेरक ठरू शकतो.पांढरकवडा परिसरात ‘बा तु भीऊ नकोस’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. यानिमित्ताने पांढरकवडा येथे आले असता, अच्युत चोपडे यांच्याशी बातचित केली, त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तर दिले. मी स्वत: या भागातील मुळचा रहिवासी असल्यामुळे या परिसरातील समस्यांची मला जाणिव आहे, त्यादृष्टीने विदर्भातील गाव निवडायचे असल्याने मी परिसरातील पांढरकवडा, पांढरदेवी, पारवा ही गावे चित्रीकरणासाठी निवडल्याचे त्यांनी सांगितले. आपले प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पारवा व घाटंजी येथे झाले असून त्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. मला लहानपणापासून कथा सांगायला व लिहायला आवडायच्या, शाळा व महाविद्यालयात असताना मी स्वत: नाटके लिहिली व त्यांचे सादरीकरण केले. महाविद्यालयातील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचो, तेव्हापासूनच मला आवड निर्माण झाली, असे चोपडे म्हणाले.अमरावती येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षात असताना कस्ती हे नाटक लिहीले व ते प्रदर्शित केले. हे नाटक श्रोत्यांना एवढे आवडले की, अक्षरश: त्यांनी डोक्यावर घेतल्याचे ते म्हणाले. यावेळी बेस्ट दिग्दर्शक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर आपण नोकरीनिमित्ताने पुणे येथे गेलो, त्यानंतर पुण्याहून अमेरिकेत गेलो, परंतु तेथे माझे मन रमत नव्हते, चार वर्षानंतर तेथून पुण्यात परत आलो, त्यानंतर हैद्राबाद येथील अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल आॅफ फिल्म इन मिडीया हा कोर्स केला व नंतर पुण्याला गेलो. तेथे अर्धविराम, रिटर्न गीफ्ट्स हे लघूपट काढले. या लघुपटामुळे माझे मनोधैर्य वाढले व मी ‘बा तु भिऊ नको’ हा चित्रपट काढायचे ठरविले. या चित्रपटात योगेश सोमन, गितांजली कुलकर्णी, शरद जाधव, निता दोंधे, अनया पाठक यांच्या भूमिका आहेत.
अमेरिकेतील नोकरी सोडून बनला दिग्दर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:34 IST
अमेरीकेतील एका मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून देवधरी येथील अच्युत चोपडे या युवकाने थेट चित्रपटसृष्टीत पाय रोवले. ‘लोकमत’ने पांढरकवडा येथे त्याची मुलाखत घेऊन मांडलेला हा त्याचा जीवनपट अनेकांना प्रेरक ठरू शकतो.
अमेरिकेतील नोकरी सोडून बनला दिग्दर्शक
ठळक मुद्देदेवधरीचा अच्युत चोपडे : पांढरकवड्यात ‘बा तु भिऊ नकोस’ या चित्रपटाचे चित्रीकरण