लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शिक्षकेत्तर कर्मचाºयांची पदभरती चालू सत्राच्या विद्यार्थीसंख्येवर आधारित पदनिश्ििचती, शिक्षक व शिक्षकेत्तर पदभरतीसाठी नाहरकत प्रमाणपत्र व वेतनेत्तर अनुदान यांसारख्या प्रलंबित प्रश्नांकरिता विदर्भ संस्थाचालकाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून निवेदन सादर केले.यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याकरिता बैठक लावून शिक्षण संस्थांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांनी दिल्याची माहिती विदर्भ संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी दिली.प्रलंबित मागण्यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व विदर्भ संस्थाचालक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.या सर्व विषयांवर चर्चा करून प्रश्न मार्गी लागावे याकरिता स्वतंत्र बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. शिष्टमंडळात विदर्भ संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार अशोक उईके, आमदार वीरेंद्र जगताप, माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख, रवींद्र फडणवीस, प्रवीण देशमुख, डॉ.संतोष ठाकरे, शिवाजी सवनेकर, खेमोधम्मो भिख्खू, अनिल जोशी, धरम अर्जून, विजय राठी, राजेंद्र महल्ले, सुरेखाताई ठाकरे, नितीन ताथीया आदीसह अनेक संस्थाचालक उपस्थित होते.
शिक्षणसंस्था संचालक मुख्यमंत्र्यांना भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:52 IST
शिक्षकेत्तर कर्मचाºयांची पदभरती चालू सत्राच्या विद्यार्थीसंख्येवर आधारित पदनिश्ििचती, शिक्षक व शिक्षकेत्तर पदभरतीसाठी नाहरकत प्रमाणपत्र व वेतनेत्तर अनुदान यांसारख्या प्रलंबित प्रश्नांकरिता ....
शिक्षणसंस्था संचालक मुख्यमंत्र्यांना भेटले
ठळक मुद्देप्रलंबित मागण्या : प्रश्न निकाली काढण्याचे सरकारकडून आश्वासन