शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१२ लाख आदिवासींच्या खात्यात थेट खावटी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST

राज्यातील आदिवासी कुटुंबांना राज्य मंत्रिमंडळाने एक विशेष एकमुस्त अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घेतला. आदिवासी आणि वनवासी समुदायांसाठी ४३४ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला सरसकट पुनरुज्जीवन योजनेंतर्गत चार हजार रुपयांच्या निर्वाह अनुदानास पात्र ठरविण्यात आले.

ठळक मुद्देप्रती कुटुंब चार हजार : शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, तिवारींचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : लॉकडाऊनमुळे हवालदिल झालेल्या आदिवासी व वनवासी पाड्यातील कुटुंबातील एक कोटी २५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अनुसूचित जमातीच्या लोकांना रोख अनुदान दिले जाणार आहे. यासाठी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने रोख निधी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तिवारी यांनी राज्य सरकारचे स्वागत केले आहे.राज्यातील आदिवासी कुटुंबांना राज्य मंत्रिमंडळाने एक विशेष एकमुस्त अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घेतला. आदिवासी आणि वनवासी समुदायांसाठी ४३४ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला सरसकट पुनरुज्जीवन योजनेंतर्गत चार हजार रुपयांच्या निर्वाह अनुदानास पात्र ठरविण्यात आले. यामुळे लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या आदिवासींना मोठा दिलासा मिळाल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोजकुमार सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती या योजनेच्या अंमलबजावणीची देखरेख करणार आहे. पुढील महिन्यात रोख हस्तांतरणाची पहिली तुकडी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.राज्यात आदिवासींची लोकसंख्या एक कोटी २५ लाखाच्यावर आहे. राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात ११ लाख ९५ हजार कुटुंब आहे. या सर्वांना सरसकट लाभ मिळणार आहे. आदिवासी विकास विभागाने वस्तू स्वरुपाची मदत प्रस्तावित केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी थेट लाभ रोख हस्तांतरण करण्यास अनुकूलता दर्शविली. लॉकडाऊनने ग्रासलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना थेट रोख हस्तांतरणाची योजना तयार केली गेली. लॉकडाऊनमुळे किरकोळ वन्य उपजाचे संकलन व विक्री प्रभावित झाल्याने आदिवासी बांधव हवालदिल झाले होते. त्यांना थेट आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी आग्रही भूमिका तिवारी यांनी मांडली. आता या आर्थिक पॅकेजने आदिवासी व वनवासी समुदायाला दिलासा मिळाला. त्यामुळे सरकारच्या नवीन योजनेचे स्वागत असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.सरकारच्या निर्णयाचे स्वागत : अ‍ॅड. शिवाजीराव मोघेपांढरकवडा : ३० वर्षांपूर्वी काँग्रेसने राज्यात आदिवासी समाजबांधवांना रोख स्वरूपात खावटी देण्याचा निर्णय घेतला होता. अनेक वर्षे तो सुरू होता. परंतु भाजप सरकारमध्ये हा निर्णय फिरवून स्वरूप बदलविले गेले. आता पूर्वीचाच रोख खावटी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने पुन्हा लागू केल्याने आदिवासी समाजबांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. यावरून भाजप सरकार आदिवासी विरोधी असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप काँग्रेसचे नेते माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केला आहे.

टॅग्स :Shivajirao Mogheशिवाजीराव मोघेgovernment schemeसरकारी योजना