पुसद : डिजीटल इंडिया जनजागृती सप्ताहांतर्गत डिजीटल इंडियासंदर्भातील शासनाच्या विविध योजना व त्या मागचा हेतु सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा या हेतुने डॉ. एन.पी. हिराणी तंत्रनिकेतन पुसदव्दारा बुधवारी येथील वसंतराव नाईक चौक ते तहसील कार्यालय या मार्गावरून रॅली काढण्यात आली. वसंतराव नाईक चौकात उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू व दीपक आसेगावकर यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी बिहारीलाल बियाणी, दीनानाथ बियाणी, पुसद बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता रवींद्र मलय, प्राचार्य ठाकुरदास बुब, अनिल चेंडकाळे, रवी देशपांडे, अनघा गडम आदींची उपस्थिती होती. सदर रॅली बाबासाहेब मुखरे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक व मुख्य कापडलाईन मार्गे नगीना चौक, आझाद चौक, महात्मा गांधी चौक, नगरपरिषद कार्यालय मार्गे तहसील कार्यालयासमोर पोहोचली. तिथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये डिजीटल शिक्षा, संपूर्ण शिक्षा, दस्तऐवज सुरक्षिततेसाठी डिजीटल लॉकरचा वापर करा, माहिती तंत्रज्ञानावर ज्याची कमांड, त्यालाच राहील जगात डिमांड अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान तहसील कार्यालयासमोर नगराध्यक्षा माधवी गुल्हाने यांच्या उपस्थितीत रॅलीचा समारोप झाला. यावेळी मान्यवरांनी शासनाच्या डिजीटल इंडियाची संकल्पना स्पष्ट केली. डिजीटलायझेशन ही प्रक्रिया कशाप्रकारे राबविली जाणार आहे, यातून सामान्य व्यक्तीला काय फायदे होणार आहे, याबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी विनोद जिल्हेवार, भरत पाटील, दिनेश बरखडा, धनंजय अत्रे, नंदकिशोर गटाणी, नवीन हिराणी, राजेंद्र आमले, अशरफ आमदणी, दीपक जाधव, नाना जळगावकर, घनशाम दुधे, अॅड़ महेश पाठक, बंडोपंत बजाज, राजेश आसेगावकर आदींसह अनेकांचा डिजीटल रॅलीत सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)
डिजीटल इंडिया जनजागृती रॅली
By admin | Updated: July 9, 2015 02:38 IST