शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

दिग्रस जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे वाटोळे

By admin | Updated: January 3, 2015 02:10 IST

शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी दिग्रस येथे जिनिंग प्रेसिंग सोसायटीची स्थापना करण्यात आली. काही वर्षापूर्वी भराभराटीस आलेल्या या सोसायटीला राजकारणाची वाळवी लागली.

प्रकाश सातघरे दिग्रसशेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी दिग्रस येथे जिनिंग प्रेसिंग सोसायटीची स्थापना करण्यात आली. काही वर्षापूर्वी भराभराटीस आलेल्या या सोसायटीला राजकारणाची वाळवी लागली. राजकारणातील हितसंबंधामुळे सोसायटीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यातच सोसायटीच्या नियम व अटींना लिजधारकांनी केराची टोपली दाखविली. एवढेच नाही तर दोन वर्षांपासून लिजधारकांनी चक्क कुलूप ठोकले आहे. हा प्रकार सुरू असताना संचालक मंडळ मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. दिग्रस शहराच्या निर्मितीपासून दिग्रस जिनिंग प्रेसिंग सोसायटी शेतकऱ्यांचे हित जोपासत होती. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्याचाही प्रयत्न होत होता. परंतु काही दिवसात ही सोसायटी आर्थिक डबघाईस आली. त्यातून २०१२ मध्ये जिनिंग प्रेसिंग सोसायटी मुंगसाजी महाराज कृषी माल प्रक्रिया केंद्र दिग्रस यांना तीन वर्षासाठी लिजवर चालविण्यास दिली. सध्या या सोसायटीवर परिवर्तन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. त्यांनीच हा निर्णय घेऊन जिनिंग प्रेसिंग लिजवर दिली. मात्र पहिल्याच वर्षी लिजधारकाने ठरल्या प्रमाणे पैसे दिले नाही. त्यामुळे दुसऱ्या वर्षी त्यांना सोसायटीने करारनामा करून दिला नाही. यावरून मुंगसाजी महाराज कृषी माल प्रक्रिया केंद्रांनी रेच्यांना चक्क कुलूप ठोकले आहे. सध्या जिनिंग त्यांच्याच ताब्यात आहे. जिनिंग प्रेसिंगच्या संचालक मंडळाने कृषी माल प्रक्रिया केंद्राच्या विरोधात दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल केला आहे.केवळ हितसंबंधामुळे लिजधारकांनी सोसायटीचे वाटोळे केल्याचा आरोप होत आहे. २०१३ पासून जिनिंग प्रेसिंग बंद आहे. लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या काही निवडक लिजधारकांची लेखी माहिती सोसायटीचे व्यवस्थापक पवार यांच्याकडे आहे. त्यात ओम कापूस प्रक्रिया केंद्र, मुंगसाजी महाराज कापूस प्रक्रिया केंद्र, साई कापूस प्रक्रिया केंद्र, मुंगसाजी कर्मचारी कापूस प्रक्रिया केंद्र यांचा त्यात समावेश असल्याची माहिती आहे. शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटीला स्वत:चा स्वार्थ जोपासण्यासाठी राजकारण्यांनी वापर केल्याचा आरोप होत आहे. सहकारातील ही मोठी संस्था लिजधारकांच्या दावणीला बांधली आहे.