शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

ढाबे, हॉटेलात गुन्हेगारांना आश्रय

By admin | Updated: May 14, 2016 02:30 IST

वर्धा जिल्ह्यातील वडनेरपासून तर पिंपळखुटीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७वर अनेक ढाबे व हॉटेल्स आहे.

राष्ट्रीय महामार्ग : ट्रक लुटीच्या दोन घटना घडूनही सर्वच विभाग उदासीनप्रवीण पिन्नमवार पांढरकवडावर्धा जिल्ह्यातील वडनेरपासून तर पिंपळखुटीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७वर अनेक ढाबे व हॉटेल्स आहे. त्यापैकी काही अधिकृत, तर काही अनधिकृतपणे थाटण्यात आली आहे. हे ढाबे व हॉटेल बंद करण्याची वेळ पाळली जात नसून रात्री-अपरात्री सुरू राहतात. त्यामुळे गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा घडल्यानंतर काही गुन्हेगार तेथे आश्रय घेत असल्याची माहिती आहे.राष्ट्रीय महामार्गावरील काही ढाबे व हॉटेलमध्ये परवानगीशिवाय दारू विक्री केली जात आहे. कोणत्याही हॉटेल व ढाब्यावर सुरू करण्याची व बंद करण्याच्या वेळेबाबत तसेच व इतर कारवाई होत नाही. त्यामुळे ते मुजोर झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर तसेच तालुक्यातील सर्वच मार्गावर ढाब्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. दिवसभर रिकामे दिसणारे ढाबे, हॉटेल्स रात्री फुल्ल दिसतात. रात्री ९ वाजतानंतरची गर्दी अनेक प्रश्नांना जन्म देणारी ठरत आहे. पांढरकवडा शहर आणि तालुक्यातील काही लोकांची अशा ढाब्यांवर नेहमीच उठ-बस सुरू असते. रात्री तेथे त्यांचा ठिय्या असतो. या ढाब्यांवर अवैधरित्या दारूची विक्री करण्यासोबतच काही ठिकाणी जुगारही खेळला जातो. त्यातून काही लोकांमध्ये अनेकदा वादही उद्भवतात. ढाब्यांवर बसण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन पाळले जात नाही. जोपर्यंत ग्राहक उठत नाही, तोपर्यंत ढाबा चालकही ढाब्याच्या झडपा पाडत नाही. शहरालगत तसेच वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात रात्री १२ ते २ वाजतापर्यंत ढाबे व हॉटेल्स सुरू असतात. वास्तविक आधीच ही दुकानदारी बंद होणे गरजेचे आहे. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने ढाबा व हॉटेल्स चालकाचे चांगलेच फावत आहे. जिल्हा ठिकाणची पथकेही कधी याप्रकरणी कारवाई करताना दिसत नाही. नुकतेच देवधरी घाटात ट्रक लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीने ट्रक चालकाचा निर्घृण खून केला होता. सदर ट्रक येण्यापूर्वी तो ट्रक येत आहे किंवा नाही, याची पाहणी करण्याकरिता सदर टोळक्याने रात्री दरम्यान एका हॉटेलचाच आधार घेतला होता, असे पोलीस तपासात पुढे येत आहे. तसेच नुकताच करंजीजवळील ट्रक दरोडा प्रकरणात लुटारूंनी नागपूरच्या दिशेने पळ काढला होता. ट्रकला थांबविण्यासाठी ट्रकच्या काचेवर दारूची बॉटल फेकून काच फोडला होता. या प्रकरणातही लुटारूंनी गुन्हा घडण्यापूर्वी हॉटेल्स किंवा ढाब्यावर आपल्या ठिय्या बसविला होता, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे येत आहे. एकूणच सतत घडणाऱ्या गुन्ह्यात ढाबे व हॉटेल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. वेळी-अवेळी ते सुरू राहात असल्याने गुन्हेगारांना तेथे आश्रय घेणे सोयीचे ठरते. पोलीस विभागाच्या वरिष्ठांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.