शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एक भाविक ठार, २५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:14 IST

चैत्र महिन्यातील महाकाली मातेच्या यात्रेसाठी चंद्रपूर जाणाऱ्या भाविकांच्या मेटॅडोअरला समोरुन येणाºया ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर २५ भाविक जखमी झाले.

ठळक मुद्देट्रक- मेटॅडोअरची भीषण धडक : चंद्रपूरला महाकाली दर्शनासाठी जाताना अपघात

ऑनलाईन लोकमतरुंझा/मोहदा : चैत्र महिन्यातील महाकाली मातेच्या यात्रेसाठी चंद्रपूर जाणाऱ्या भाविकांच्या मेटॅडोअरला समोरुन येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर २५ भाविक जखमी झाले. हा अपघात यवतमाळ- चंद्रपूर मार्गावरील पांढरकवडा तालुक्यातील ँमोहदा येथे बुधवारी पहाटे ३ वाजता घडला. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकमध्ये फसलेला मेटॅडोअर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.परभणी जिल्ह्यातील धनेवाडी, करेवाडी, सायला, शिरपूर, उकडगाव, कावरगाव येथील भाविक मेटॅडोअरने (क्र.एम.एच-२४-ए-२३४४) चंद्रपूरकडे जात होते. या मेटॅडोअरमध्ये ३० ते ३५ भाविक प्रवास करीत होते. मोहदा गावाजवळ समोरुन आलेल्या ट्रकने (क्र.एम.एच.३४-एबी-९९४९) मेटॅडोअरला जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, मेटॅडोअर ट्रकमध्ये जाऊन फसला. पहाटेच्या वेळी एकच हलकल्लोळ झाल्याने लगतच्या हिंदुस्थान ढाब्याचे संचालक रिजवान शेख घटनास्थळी धावून गेले. त्या ठिकाणी अनेक जण जखमी अवस्थेत होते. त्यांनी तत्काळ पांढरकवडाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजरमे यांना मोबाईलवरुन माहिती दिली. पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळावर दाखल झाले. मेटॅडोअरच्या केबिनमध्ये फसून असलेल्या भाविकांना बाहेर काढणे कठीण जात होते. त्यामुळे जेसीबी बोलावून मेटॅडोअर ओढून काढला. त्यानंतर राळेगाव, पांढरकवडा आणि यवतमाळ येथून बोलाविलेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.या अपघातात रेणुका अनंत पिसाळ (२७) रा. कावरगाव ता. पुर्णा जि. परभणी या ठार झाल्या. तर इंदू दीपक जाधव, दीपक सखाराम जाधव, विनायक दीपक जाधव, भीमा शंकरराव शेवटे, गणेश ज्ञानोबा बोडखे, गोदावरीबाई शेवटे, शांताबाई कखार, धम्माजी समाजी साबळे, इंदूबाई धोंडीबा खिरटकर, प्रयाग सर्जेराव आगलावे यांच्यासह शोभाबाई मिरगे, लक्ष्मीबाई, चैत्राबाई जखमी झाले. जखमींपैकी शांताबाई कखार व धम्माजी साबळे यांची प्रकृती गंभीर आहे.ढाबा चालक ठरला देवदूतहा अपघात घडला तेथून काही अंतरावर हिंदुस्थान ढाबा आहे. मोठा आवाज झाल्याने ढाब्याचे संचालक रिजवान शेख घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीच सर्व प्रथम पोलिसांना माहिती दिली. रिजवान वेळेवर पोहोचले नसते तर जखमींना उपचार मिळण्यास विलंब झाला असता. एवढेच नाही तर अपघातातून सुखरुप बचावलेल्या भाविकांना त्यांनी आपल्या ढाब्यावर आणले. त्या ठिकाणी चहा-पानासह या भाविकांची भोजनाचीही व्यवस्था केली. अपघातग्रस्तांसाठी रिजवान शेख देवदूतच ठरला.११ महिन्याचा मुंजा सुखरुपया भाविकांच्या मेटॅडोअरमध्ये ११ महिन्याचा मुंजा सोपान लांडे हा आई विमलसोबत दर्शनासाठी जात होता. अपघातानंतर प्रत्येक भाविकाला मार लागला. परंतु मुंजाला साधे खरचटलेही नाही. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आला.मेटॅडोअरमधील पाट्यांनी केला घातमेटॅडोअरमधून ३० ते ३५ भाविक प्रवास करीत होते. यासाठी मेटॅडोअरमध्ये पाट्यांचे पार्टिशन करण्यात आले होते. अपघातानंतर बसलेल्या जबर धक्क्याने या पाट्या आणि त्यावर बसलेले भाविक खालच्या बाजूला असलेल्या भाविकांवर कोसळले. लाकडी पाट्यांचा डोक्याला जबर मार लागल्याने जखमींची संख्या वाढल्याचे प्रत्यक्षदर्शिनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात