शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

आठ ग्रामपंचायतींचा विकास आराखडा

By admin | Updated: January 31, 2016 02:31 IST

नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे.

विशेष सभा : यवतमाळ नगरपरिषदयवतमाळ : नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे. या सभेत १२ विषयांवर चर्चा केली जाणार आहे. यात १४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार प्राप्त अनुदानातील विकास आराखड्याला मान्यता देण्यात येणार आहे. नगरपरिषद क्षेत्रात लगतच्या आठ ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या आहे. या ठिकाणी विकास कामे करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. त्याच्या व्यवस्थापनाकरिता सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला जाणार आहे. शहराला अमृत योजनेतून हरित पट्टा उद्यान तयार करण्यासाठी १० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या बाबत चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत रुग्ण कल्याण समिती स्थापन केली जाणार आहे. खासदार निधीतून हायमास्ट लावण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय व वित्तीय मान्यता आमदार निधीतून एलईडी लाईट लावण्यास मान्यता, विकास आराखड्यांतर्गत दाते कॉलेज मार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनाला मान्यता, अग्निशामक नूतनीकरण सुरक्षा प्रमाणपत्राकरिता घेण्यात येणाऱ्या शुल्काची रक्कम निश्चित करण्यात येणार आहे. तलावफैलातून जाणारा पाटीपुरा, सुराणा ले-आऊट व माळीपुरा भागातून जाणाऱ्या नाल्याला विकसित करण्यासाठी विकास आराखड्यात फेरबदल प्रस्ताव सभेपुढे ठेवला जाणार आहे. अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. आठवडीबाजारात नवीन मत्स्य बाजारपेठेत शीतगृह आणि बर्फ कारखाना उभारण्याच्या प्रस्तावालाही सभेपुढे ठेवले जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)