शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधन शोधणारी टोळी जाळ्यात

By admin | Updated: May 19, 2016 02:08 IST

गुप्तधन शोधण्यासाठी वर्धा जिल्ह्यातून मारेगाव तालुक्यात आलेली टोळी आवळगाव येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

आवळगावच्या नागरिकांचे धाडस : दोघांना अटक, घटनास्थळावरून पूजेचे साहित्य जप्त मारेगाव : गुप्तधन शोधण्यासाठी वर्धा जिल्ह्यातून मारेगाव तालुक्यात आलेली टोळी आवळगाव येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकली. या टोळीतील सहा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून दोन आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले.तालुक्यातील जळका येथील प्राचिन हेमाडपंथी पांडवदेवी देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात गुप्तधन असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. अनेकांनी या परिसरात गुप्तधन काढल्याचेही बोलले जाते. या परिसरात अनेक ठिकाणी हळदी-कुंकू, लिंबू अशा पूजेच्या साहित्यासह खोदकाम केल्याच्या खुना बरेचदा दिसून येतात. मात्र नेमके खोदकामात खरच गुप्तधन मिळते काय, याचा मात्र गुप्तधन शोधणारे टोळके पोलिसांच्या हातात लागत नसल्याने शोध लागत नाही. गेल्या सोमवारी तालुक्यातील आवळगाव येथील नीलेश सोनबा टेकाम यांच्या शेतात नांगरणी करण्याकरिता वागदरा येथील गजानन इंगोले हा रात्री १० वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर घेऊन गेला. तेथे त्यांना हनुमान मंदिराजवळ ८ ते १० जण संशयास्पद खोदकाम करताना आढळले. इंगोले यांनी नांगरणी न करता गावात परत जाऊन ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. गावातील दिनेश टेकाम, तुळशिराम टेकाम यांच्यासह १५ ते २० ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मात्र गावकऱ्यांना बघून टोळीतील सहा जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर मनोहर बापूराव राजूरकर (५८) रा.दरोडा, ता.हिंगणघाट व किशोर नारायण शिंदे (२२) रा.खेमकुंड, ता.राळेगाव याला गावकऱ्यांनी पकडले. या दोघांनाही पकडून ग्रामस्थांनी त्यांना गावात आणले. त्ोथे त्यांची अधिक चौकशी केली असता, ‘आम्ही वर्धा जिल्ह्यातून गुप्तधन शोधण्यासाठी आलो असून आमच्या टोळीत आठ लोक आहे’, असे त्यांनी सांगितले. या टोळीत पूर्वी आवळगाव येथेच राहणारा आणि आता पिंपळगाव, ता.हिंगणघाट येथे राहणारा अशोक वारलुजी मडावी हा समाविष्ट असून त्यानेच आम्हाला हनुमान मंदिरामागे तीन किलो सोने असल्याचे सांगितल्याचेही त्यांनी कबूल केले. टोळीतील किशोर शिंदे हा पायाळू असून त्याच्या मदतीने आम्ही सोन्याचा शोध घेतो, अशी माहितीही त्या दोघांनी गावकऱ्यांना दिली.नंतर पोलीस पाटील भाऊराव टेकाम यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ मारेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आवळगाव गाठून आरोपींना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून लिंबू, तांदूळ, घमेले, फावडा, टिकास, दोन लोटे, हिरवा कापड व इतर साहित्य जप्त केले. वर्धा जिल्ह्यातील गुप्तधन शोधणाऱ्या टोळीकडून नरबळीच्या होणाऱ्या घटना लक्षात घेता, मारेगाव पोलिसांनी पळून गेलेल्या सहा आरोपींच्या शोधात पथक रवाना केले. मात्र वृत्तलिहिस्तोवर आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. अशाप्रकारच्या घटना यापूर्वी तालुक्यात घडल्या आहेत. याप्रकरणी कलम २ (१) ख ४/३ महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा पायबंद कलमाखाली दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)मारेगाव तालुक्यात यापूर्वीही घडल्या घटनामारेगाव तालुक्यात यापूर्वीही काही नरबळीच्या घटना घडल्या आहेत. गुप्तधन काढण्यासाठी नरबळी द्यावा लागतो, अशी दंतकथा आहे. गुप्तधन शोधणारी टोळी बालकांना हेरून त्याची तजवीज करतात, असा आजवरचा अनुभव आहे. तालुक्यात घनदाट जंगली आहे. पांडवदेवी देवस्थान परिसरात तर प्राचिन काळापासून अद्यापही घनदाट जंगल आहे. या जंगलात अज्ञातवासात असताना पांडवांचे वास्तव्य होते, होते अशी आख्यायीका आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात धन असावे, असा अंदाज बांधला जातो. त्यातूनच सोमवारी या टोळीने या परिसरात गुप्तधन शोधण्यासाठी पूजा, अर्चना केल्याचे दिसून येते. मात्र आवळगाव येथील ग्रामस्थांच्या सतर्कतने त्यांचा डाव हाणून पडला. ही टोळी नरबळी देणार होती का, या दिशेनेही पोलीस आता तपास करीत आहे. त्यासाठी पोलिसांनी पथक गठित केले असून ते वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले आहे. ठाणेदार उमेश पाटील स्वत: या तपासावर लक्ष ठेवून आहेत.