शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये इच्छुकांचा हिरमोड

By admin | Updated: June 9, 2014 23:51 IST

नगरपालिकांच्या अध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ आटोपल्याने जूनमध्ये पालिका अध्यक्षांची निवड होणार होती. त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र विधीमंडळ अधिवेशनात

पुसद : नगरपालिकांच्या अध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ आटोपल्याने जूनमध्ये पालिका अध्यक्षांची निवड होणार होती. त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र विधीमंडळ अधिवेशनात नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ सहा महिन्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावर डोळा लावून बसलेल्यांचा हिरमोड झाला आहे. पुसद नगरपरिषद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. गेल्या अडीच वर्षापासून शिवसेनेच्या सहकार्याने राष्ट्रवादीची सत्ता अबाधित आहे. मागील वेळी अडीच वर्षानंतर सत्तांतर झाले. यावर्षीही त्याची पुनरावृत्ती होते की काय, अशी चर्चा शहरात रंगत होती. मात्र नगराध्यक्षपदाला मुदतवाड मिळाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधणार्‍यांचा हिरमोड झाला. साधारणत: २0 जूनपर्यंत नगराध्यक्षपदाची निवडणूक होईल, या विचाराने अनेक जण मोर्चेबांधणी करीत होते. पक्षश्रेष्ठींकडे नगरसेवकांना घेऊन बांधणी सुरू होती. सध्याचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी असल्याने सीताबाई कांबळे या पदावर कार्यरत आहे. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण होत आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामे केली. तसेच कोणत्याही गोष्टीला विरोध केला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा राष्ट्रवादी पक्षात होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या दोन महिलांच्या नावाचीही चर्चा होती. दोन्हीही नगरसेविका शिक्षिका आहे आणि विद्यमान नगराध्यक्षही सेवानवृत्त मुख्याध्यापिका आहे. परंतु नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढल्याने सर्वांची निराश झाली आहे. राष्ट्रवादीकडे सहा महिला नगरसेविका असल्यातरी यातील काही नगराध्यक्षपदापासून अलिप्त होत्या. पुढील अडीच वर्ष नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे राजकीय खेळी खेळणे सुरू होती. नगराध्यक्ष पदासाठी एका नावाची निवड पक्षनेते मनोहरराव नाईक करणार असल्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्या निर्णयावर लागल्या होत्या. परंतु आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे कुणाच्या नाराजीला सामोरे जाण्याची कुणाचीही तयारी नाही. त्यामुळे नगराध्यक्ष कोण, अशी चर्चा रंगत असताना मुदतवाढ मिळाली.याबाबत नगराध्यक्ष सीताबाई कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता अडीच वर्षाच कार्यकाळ २0 जूनला संपत आहे.त्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त होऊन निवडूक लागणार, याची माहिती आपल्याला आहे. या पदाला मुदतवाढ मिळाली, अशी चर्चा कानावर आली आहे. मात्र अद्याप अधिकृत पत्र नगरपरिषदेकडे आले नाही. तसेच निवडणूक संदर्भात कार्यक्रमही जाहीर झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)