शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दाते महिला बॅंकेत अडकलेल्या ठेवीदारांचे पैसे मिळणार परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 22:25 IST

बाबाजी दाते महिला बँकेचा बँकिंग परवाना आरबीआयने रद्द केला आहे. यानंतर अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी ठेवीदारांचे पैसे परत देता यावे म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या ठेवीदारांनी ठेवी परत मिळविण्यासाठी अर्ज केले नाही, अशा ठेवीदारांना पैसे परत मिळावे म्हणून मोहीम हाती घेतली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बाबाजी दाते महिला सहकारी बँक अवसायनात निघाल्यानंतर अवसायकांनी ठेवीदारांना क्लेम सादर करण्यासाठी १६ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहेे. या बँकेचे ३६ हजार ग्राहक आहेत. त्यांच्या १८५ कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. या ठेवीदारांना पैसे परत मिळविण्यासाठी दोन महिन्याच्या मुदतीत दावे दाखल करावे लागणार आहेत. बाबाजी दाते महिला बँकेचा बँकिंग परवाना आरबीआयने रद्द केला आहे. यानंतर अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी ठेवीदारांचे पैसे परत देता यावे म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या ठेवीदारांनी ठेवी परत मिळविण्यासाठी अर्ज केले नाही, अशा ठेवीदारांना पैसे परत मिळावे म्हणून मोहीम हाती घेतली आहे.  अशा ठेवीदारांना दोन महिन्यांत क्लेमकरिता अर्ज करण्याची नोटीस बजावली आहे. यामध्ये अवसायकांनी १६ नोेव्हेंबरपासून १६ जानेवारी २०२३ पर्यंतचा कालावधी राखीव ठेवला आहे. या कालावधीत पैसे न मिळालेल्या लाभार्थ्यांना क्लेमसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. यामुळे अनभिज्ञ असलेल्या महिला बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि नांदेड जिल्ह्यातील १९ शाखांमध्ये बँकेचे ३६ हजार ग्राहक आहेत.  या ठेवीदारांना पैसे परत मिळावे म्हणून अवसायकाकडून प्राधान्याने प्रयत्न होणार आहे. अशा स्थितीत क्लेम सादर करणाऱ्या लाभार्थ्यांना वसुलीनंतर पैसे मिळणार आहे. 

भागभांडवल न मिळालेल्यांना करता येणार दावा- हे दावे सादर करताना बँकेकडून न मिळालेल्या रिटायरमेंटच्या पैशासह बँकेकडे असलेली शेअर्स थकीत रक्कम आणि ठेवीदाराचे न काढता आलेले पैसे या बाबी दाव्यामध्ये येणार आहेत. अशा विविध प्रकारच्या ग्राहकांना दोन महिन्यांच्या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत. 

पाच लाखांच्या आतील ठेव प्राधान्याने निकाली निघणार आहे. यानंतर क्रमाक्रमाने दावे निकाली निघणार आहे. त्यासाठी दावे मागविण्यात आले आहेत. वसुलीच्या मोहिमेवर प्रथम लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ठेवीदारांचा प्रत्येक पैसा परत करण्यावर भर राहणार आहे.- नानासाहेब चव्हाण, अवसायक, बाबाजी दाते महिला बँक, यवतमाळ

 

टॅग्स :bankबँक