शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाच्या फाईल चक्क खड्ड्यात

By admin | Updated: July 6, 2015 02:47 IST

शेतकऱ्यांच्या विविध योजनांच्या राळेगाव तालुका कृषी विभागाच्या फाईल चक्क एका खड्ड्यात आढळून आल्या.

राळेगावातील प्रकार : फाईल पोलिसात जमा राळेगाव : शेतकऱ्यांच्या विविध योजनांच्या राळेगाव तालुका कृषी विभागाच्या फाईल चक्क एका खड्ड्यात आढळून आल्या. बेवारस स्थितीत आढळलेल्या पाच फाईल राळेगाव पोलीस ठाण्यात जागरुक नागरिकाने जमा केल्या. या घटनेने कृषी वर्तुळात खळबळ उडाली आहे. राळेगाव येथील पंचायत समितीच्या मागच्या बाजूने एका खड्ड्यात पडलेल्या काही फाईल जागरुक नागरिक संजय दुरबुडे यांना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास दिसून आल्या. त्यांनी या फाईल कशाच्या म्हणून बघितल्या असता त्यावर राळेगाव तालुका कृषी अधिकारी असा मजकूर आढळून आला. उत्सुकता म्हणून फाईल उघडून बघितल्या असता पाच शेतकऱ्यांच्या विविध योजनांच्या त्या फाईल होत्या. फाईलमध्ये कार्यालयाचा मोक्का तपासणी अहवाल, सूक्ष्म सिंचन मंजुरी आदेश, शेतकऱ्यांच्या नोंदी असणारे नकाशे, सातबारा, कृषी अधिकारी अहवाल, त्यावर तालुका कृषी अधिकाऱ्यांची शासकीय मुद्रा असलेली सही, शिक्का आदी दिसून आले. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताकरिता कृषी अधिकारी कार्यालयात विविध योजनेसाठी ही कागदपत्रे सादर केली असावी. कार्यालयाने या कागदपत्रांची फाईल तयार केली. मात्र या फाईली खड्ड्यात आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे कार्यालयातील कोणत्याही फाईल संबंधित विभागाने जपून ठेवणे आवश्यक असते. शासकीय दस्ताऐवजाची जपणूक ही जबाबदारी संबंधित कार्यालयाची असते. मात्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या या फाईली खड्ड्यात फेकल्या की कुणी जाणीवपूर्वक नेऊन टाकल्या हे मात्र कळायला मार्ग नाही. संजय दुरबुडे यांनी या फाईल राळेगाव पोलीस ठाण्यात नेऊन जमा केल्या. दरम्यान याबाबत तालुका कृषी अधिकारी एन.आर. कुंभरे यांना विचारणा केली असता कृषी अधिकारी कार्यालय दुसऱ्या इमारतीत स्थलांतरित करणे सुरू आहे. फाईल त्या कार्यालयात नेताना कोठे तरी रस्त्यात पडल्या असतील, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)