शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:10 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण द्यावे, अशी मागणी तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण द्यावे, अशी मागणी तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नानंतर १९५० मध्ये अनुसूचित जाती, जमातीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात धनगर समाजाचा अभ्यास करून या समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ वा क्रमांक देण्यात आला. मात्र राज्यकर्त्यांनी अद्याप धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या नाही. परिणामी हा समाज विकासापासून दूर असल्याचे निवेदनात म्हटले आहे.विद्यमान सरकार विरोधी पक्षात असताना त्यांनी सत्तेत आल्यानंतर आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. समाजाला संविधानाने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, शेळी-मेंढी पालनाकरिता चराईसाठी राखीव जंगल तसेच शासकीय जमिनीवर रहिवासी असलेल्यांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे, समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत शिष्यवृत्ती व स्वतंत्र वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. निवेदनावर श्रीधर मोहोड, सुखदेव नवरंगे, सुधाकर पिंगाणे, तुकाराम कोळपे, नथ्थू महानर, राजेश गोरडे, भानुदास आंबेकर, सुधाकर काळे आदींसह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे.

टॅग्स :reservationआरक्षण