शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

दारव्हा राष्ट्रवादीतर्फे एसडीओंना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 21:58 IST

तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पीक विमा भरपाईसह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पीक आणेवारी ५० टक्केच्या आत असल्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पीक विमा भरपाईसह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.पीक आणेवारी ५० टक्केच्या आत असल्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यातील जनता व शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच खरीप हंगामातील पीक विम्याची भरपाई मिळेल, अशी आशा होती. मात्र ठरावीक व कमी पेरा असलेल्या शेतकºयांनाच्या पिकांना विमा लागू करण्यात आला. कापूस, सोयाबीन यासारख्या प्रमुख पिकांची लागवड करणाºया शेतकºयांना विम्याची भरपाई मिळाली नाही. एवढेच नव्हे, तर कोणत्या पिकाला विमा मंजूर करण्यात आला, याची आकडेवारीसुद्धा बँकेत उपलब्ध नाही. यामुळे सर्व विमाधारक शेतकºयांना पीक विमा लागू करून तत्काळ शेतकºयांच्या खात्यात रक्कम वळती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.मागील हंगामात खरडून गेलेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाई आणि शेतकरी सन्मान योजनेतील दुसºया टप्प्याची रक्कम शेतकºयांना देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांच्या नेतृत्वात एसडीओंना निवेदन सादर करताना तालुकाध्यक्ष प्रा.चरण पवार, शहराध्यक्ष नासीर शेख, महिला आघाडी तालुकाध्यक्ष नलिनी राठोड, प्रा.सुभाष गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर ठाकरे, शहराध्यक्ष सादीक शेख, रामदास राऊत, राजू पेटकर, एजाज खान, मंगला चोरडिया, कुसुम कश्यपवार, पवन काळे, अक्षय सुर्वे, प्रवीण जाधव, प्रकाश आडे, भारत सावळे, चंदन चव्हाण, प्रशांत सुरस्कर आदी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस