लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : राज्य शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्जाची तारीख वाढवून देण्याची मागणी मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टीस फॉर वेलफेअरच्यावतीने (एमपीजे) निवेदनातून उपविभागीय अधिकाºयांकडे केली आहे.कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची ई-सुविधा केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. त्यातच आॅनलाईन यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. थम्ब अपडेट सुविधेअभावी शेतकºयांना प्रचंड त्रास होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी यामुळे त्रस्त आहे. हा प्रकार टाळण्यासाठी आणि शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी आॅनलाईन अर्जाची मुदत १५ सप्टेंबर आहे. ती वाढवून द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी एमपीजेचे अध्यक्ष मोहसीन राज, सचिव जहीर हमीद, वसीम रसूल, काझी अजहर, शेख कलीम, फैयाज रियासत यांनी केली आहे.
कर्जमाफी अर्जास मुदतवाढीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 21:57 IST
राज्य शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्जाची तारीख वाढवून देण्याची मागणी मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टीस ...
कर्जमाफी अर्जास मुदतवाढीची मागणी
ठळक मुद्देउमरखेड एमपीजेचे निवेदन : सर्व्हर डाऊन असल्याने शेतकरी अडचणीत