शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची भरपावसातच दुचाकीवर प्रसूती; यवतमाळातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 21:03 IST

मुरझडी येथील २० वर्षीय गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी यवतमाळला आली. तपासणी केल्यानंतर गर्भ मृत असल्याचे समजले. खासगी स्त्री रुग्णालयात जात असतानाच दुचाकीवर प्रसवकळा सुरू झाल्या.

ठळक मुद्देबेवारस मृत अर्भकामागील वास्तव उघडअवधूतवाडी पोलिसांनी दोन तासातच लावला छडा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील भोसा नाका परिसरात मंगळवारी दुपारी मृत अवस्थेतील अर्भक सापडले. या घटनेचा अवधूतवाडी पोलिसांनी शोध घेतला असता भीषण वास्तव पुढे आले.मुरझडी येथील २० वर्षीय गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी यवतमाळला आली. तपासणी केल्यानंतर गर्भ मृत असल्याचे समजले. खासगी स्त्री रुग्णालयात जात असतानाच दुचाकीवर प्रसवकळा सुरू झाल्या. त्यातच दुपारी १.३० वाजता मुसळधार पाऊस होता. यात तो मृत गर्भ कधी बाहेर पडला हे समजलेच नाही. तिची रस्त्यावरच प्रसूती झाली. महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने गावी हलविले.शासनाच्या अनेक योजना माता व बालमृत्यू थांबविण्यासाठी कार्यान्वित आहे. मात्र त्यानंतरही सर्वांपर्यंतच लाभ पोहोचेल अशी स्थिती नाही. मुरझडी येथील २० वर्षीय विवाहिता दीड वर्षातच गर्भवती राहिली. घरात आनंदाचे वातावरण होते. रोजमजुरी करणारे कुटुंब असूनही सुनेची देखभाल केली जात होती. आठ महिने पूर्ण झाल्याने २२ सप्टेंबर रोजी मंगळवारी सकाळी सुनेला घेऊन सासरे दुचाकीवर यवतमाळला आले.येथील दत्त चौकातील सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी केली. त्यात डॉक्टरने गर्भ मृत असल्याचे सांगितले. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला सोनोग्राफी तज्ज्ञाने दिला. दुचाकीवर सासरा व सून गावावरुन आले होते. डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकून हे दोघेही सुन्न झाले. भोसा मार्गावरील स्त्री रोग तज्ज्ञाकडे तपासणीला जायचे म्हणून दत्त चौकातून निघाले. तितक्यात दुपारी १.३० वाजता जोरदार पाऊस सुरू झाला. कसेबसे भोसा नाका परिसरात पोहोचत नाही तोच त्या महिलेची दुचाकीवरच प्रसूती झाली. अवघडलेल्या अवस्थेत तिला असह्य कळा सुरू झाल्या.सोबत असलेल्या सासऱ्यांना सांगण्याच्या आतच गर्भ बाहेर पडला. वरून जोरदार पाऊस असल्याने रस्त्यावरही कुणीच नव्हते. स्त्री रुग्णालयापासून काही मीटर अंतरावरच हे अघटित घडले. त्यानंतर महिला बेशुद्ध झाली. सासºयाने कसेबसे दुचाकीवरून आपले गाव गाठले.पाऊस थांबताच मृतावस्थेतील अर्भक मुख्य रस्त्यावर पडलेले पाहून खळबळ उडाली. अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासातच या घटनेचा छडा लावला. नंतर त्यांची उलट तपासणी केली. यात अतिशय करुण कहाणी पुढे आली. अखेर ते अर्भक त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. शोध पथकातील सुधीर पिदूरकर व सहकाऱ्यांनी ही घटना उघड केली.मुरझडीत झाले अंत्यसंस्कारपहिलाच गर्भ मृतावस्थेत बाहेर आला. यामुळे हादरलेल्या त्या महिलेला पोलिसांनीही आधार दिला. नंतर त्या मृत अर्भकावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंबीयांनी दर्शविली. पोलिसांनी तो मृत अर्भक कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. बुधवारी त्याच्यावर मुरझडीत अंत्यसंस्कार झाले.

टॅग्स :Deathमृत्यू