शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील रेणुकापूर वनक्षेत्रात काळविटाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:16 IST

काळविटाची शिकार करुन मांसविक्री करणाऱ्या एकास यवतमाळ जिल्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्याजवळून मांस, तराजू, गंज, दुचाकी आदी मुद्देमाल जप्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ११ वाजता रेणुकापूर वनक्षेत्रात करण्यात आली.

ठळक मुद्देमांस विकताना एक अटकेतचामडे, तराजू व गंज जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काळविटाची शिकार करुन मांसविक्री करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. त्याच्याजवळून मांस, तराजू, गंज, दुचाकी आदी मुद्देमाल जप्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ११ वाजता रेणुकापूर वनक्षेत्रात करण्यात आली.काळविटाची शिकार करुन मांस विक्री केली जात असल्याची माहिती नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांना मिळाली. त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली. यानंतर वनविभागाचा ताफा जंगलात पोहोचला. तेथे मांस विकताना नमूना मिस्टिंग पवार (६५) याला अटक करण्यात आली.घटनास्थळाहून काळविटाचे शिर, चामडी, शरीराचे इतर अवयव यासह तराजू, जर्मनचा गंज, दुचाकी (एमएच २९ बीएल ८४८७) आदी साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्घ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई यवतमाळचे उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे, उपविभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे, वनपाल आर.डी. जाधव, वनरक्षक सृष्टी राठोड, पी.पी. खत्री, अशोक कदम, सचिन देशमुख यांनी पार पाडली.नेरमधील सलग दुसरी कारवाईवन्यजीवांची शिकार प्रकरणी तालुक्यातील १५ दिवसातील ही सलग दुसरी कारवाई आहे. उत्तरवाढोणा येथे बिबट्याचे मांस व काळविटाचे शिंग जप्त करण्यात आले होते. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच काळविटाचे शिकार प्रकरण शुक्रवारी उघडकीस आले. नेर वनपरिक्षेत्रात बिबट, काळविट, ससा या वन्यजीवांच्या शिकारीत मोठी वाढ झाली आहे. यावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव