शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दीर-भावजय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:29 IST

मुलीच्या घरी आयोजित ‘माता का जगराता’ कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दीर-भावजय जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देबोटोणी येथे ट्रकची कारला धडक : सात जण गंभीर, मृत व जखमी मारेगावचे

ऑनलाईन लोकमतमारेगाव : मुलीच्या घरी आयोजित ‘माता का जगराता’ कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दीर-भावजय जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मारेगाव-करंजी मार्गावरील बोटोणी गावाजवळ शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडला. मृतक व सर्व जखमी मारेगाव येथील किराणा व्यावसायिक सिडाणा परिवारातील आहे.जितेंद्र दयाराम सिडाणा (४७) आणि किरणताई मोहन सिडाणा (४०) रा. मारेगाव अशी मृत दीर-भावजयीचे नाव आहे. तर श्रीराम दयाराम सिडाणा (४५), दिव्या जितेंद्र सिडाणा (३५), नितू श्रीराम सिडाणा (४२), इंदर दीपक चान्ना (२८), रश्मी इंदर चान्ना (२५), कान्हा श्रीराम सिडाणा (५), लाडो जितेंद्र सिडाणा (९) सर्व रा. मारेगाव अशी जखमींची नावे आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मारेगाव येथील किराणा व्यावसायिक सिडाणा परिवार करंजी येथील मुलीकडे ‘माता का जगराता’ कार्यक्रमासाठी शनिवारी रात्री १० वाजता क्र.एम.एच.२९-आर-५५६७, आणि क्र.एम.एच.२९-एडी-३३१६ या दोन कारने करंजीकडे जात होते. त्यावेळी बोटोणी ते जळका दरम्यान समोरुन आलेल्या भरधाव ट्रकने एका प्रथम पांढºया रंगाच्या कारला जबर धडक दिली. त्याच वेळी पाठीमागे असलेली लाल रंगाची दुसरी कारही या अपघातग्रस्त वाहनांवर धडकली. धडक एवढी भीषण होती की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात पहिल्या कारमधील जितेंद्र आणि किरणताई ठार झाले. तर सात जण गंभीर जखमी झाले.जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताने मारेगाववर शोककळा पसरली आहे. रविवारी दुपारी दीर-भावजयीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जितेंद्र सिडाणा यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तर किरणताई सिडाणा यांच्या मागे पती, दोन मुली, एक मुलगा आहे.

टॅग्स :Accidentअपघात