शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

‘एसआयटी’ अहवालावर जबाबदारी होणार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:09 IST

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणी विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल ईन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली आहे.

ठळक मुद्देफवारणीचे २० बळी : कृषी, आरोग्य, महसूलला विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणी विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल ईन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली आहे. तब्बल चार तास विविध यंत्रणेच्या प्रमुखाकडून या पथकाने माहिती घेतली असून समितीच्या अहवालावरच विषबाधेची जबाबदारी निश्चित होणार आहे. त्यामुळे ही समिती जिल्ह्यात दाखल होताच सर्वांनाच धडकी भरली.यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे २० शेतकºयांचा मृत्यू तर ७०० जणांना विषबाधा झाली. याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसआयटी’चे गठण केले. अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांच्या अध्यक्षतेत ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीत पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे, कृषी सहसंचालक डॉ. सुभाष नागरे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. धनराज उंदीरवाडे, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांचा समावेश आहे. ही समिती सोमवारी यवतमाळात दाखल झाली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात फवारणी बाधेची स्थिती जाणून घेतली.बाजारात कोणत्या प्रकारची कीटकनाशके विकली गेली, नेमके याच वर्षी काय बदल झाला, कृषी विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाने काय कारवाई केली, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून विषबाधा रुग्णांसाठी कोणता प्रोटोकॉल पाळला जातो आणि मृत्यू झालेले आणि बाधित रुग्णांच्या कौटुंबिक स्थितीची सविस्तर माहिती घेतली. प्रत्येक विभागाला सूक्ष्म माहिती देण्यास सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.टी.जी. धोटे, मेडिलकचे डॉ. बाबा येलके, डॉ. घोडेस्वार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते.‘मेडिकल’मध्ये विषबाधितांची भेट‘एसआयटी’च्या पथकाने येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. वार्ड क्र. १८ मध्ये उपचार घेत असलेल्या विषबाधित शेतकरी-शेतमजुरांसोबत संवाद साधला. यावेळी सुनील उकंडे (३२) रा. मनपूर ता. आर्णी, विशाल लक्ष्मण मडावी रा. राजूरवाडी ता. घाटंजी, विजय राठोड रा. ब्रम्हनाथ ता. दारव्हा, हरिभाऊ कुंभेकार रा. भारी ता. यवतमाळ यांच्याशी संवाद साधला. किती दिवसापासून फवारणी करीत आहात, कोणती औषध फवारली, फवारणीचे मिश्रण कुणाच्या सांगण्यावरून केले, किती औषधाचे मिश्रण तयार केले, याची माहिती पथकातील सदस्यांनी घेतली. त्यानंतर अतिदक्षता कक्षात तीन रुग्णांची पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरवार यांनी रुग्णालयातील समस्या पथकापुढे मांडल्या.दारव्हा येथे फवारणी बाधितांशी चर्चादारव्हा : ‘एसआयटी’ पथकाने सोमवारी दारव्हा येथे भेट दिली. प्रत्यक्ष शेतकºयांशी विश्रामगृहावर संवाद साधला. यावेळी तालुक्यातील पाच शेतकºयांना बोलाविण्यात आले होते. तब्बल दोन तास ही बैठक सुरूच होती. यावेळी विजय भाऊराव राठोड (इरथळ), मोहन देविदास हिवराळे (बिजोरा), भारत शंकर साखरकर (अंंतरगाव), विष्णू महादेव गावंडे (घनापूर), भारत उकंडा आडे (शेलोडी) यांच्याशी चर्चा करून विषबाधेची कारणे जाणून घेतली. त्यानंतर तालुक्यातील उचेगावच्या सेवादासनगर येथे रवी राठोड या मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली.सर्वांनाच भरली धडकीमुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या ‘एसआयटी’चे पथक जिल्ह्यात दाखल झाले. ही समिती सूक्ष्म अभ्यास करून फवारणी विषबाधा प्रकरणास जबाबदार असणाºयांवर दोष निश्चित करणार आहे. कृषी विभागावरच या पथकाचा अधिक भर होता. हे प्रकरण इतक्या उशिरा का बाहेर आले, यावरही कृषी यंत्रणेकडे जाब विचारण्यात आला. कीटकनाशकांच्या हाताळणीबाबत कृषी विभाग काय उपक्रम राबवित आहे, याचाही अहवाल मागविला. यामुळे कृषी विभागासोबतच सर्वांनीच या पथकाची धास्ती घेतली आहे.