शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

ठरलं ! ‘या’ दिवसापासून ‘2,000’ घेणार नाही; भुर्दंड बसण्याच्या भीतीने एसटीची डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 07:51 IST

विलास गावंडे यवतमाळ :   रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट चालविण्यासाठी ३० सप्टेंबर शेवटचा दिवस दिला आहे. एसटी ...

विलास गावंडेयवतमाळ :   रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट चालविण्यासाठी ३० सप्टेंबर शेवटचा दिवस दिला आहे. एसटी मात्र ४८ तास आधीपासूनच ही नोट स्वीकारणे बंद करणार आहे. २८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून दोन हजाराची नोट स्वीकारायची नाही, असा आदेश महामंडळाचे वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी काढला आहे. 

बँकेचा आदेश३० सप्टेंबरच्या रात्री १२ वाजेनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असा रिझर्व्ह बँकेचा आदेश आहे. एसटीने या दिवसापर्यंत प्रवाशांकडून ही नोट स्वीकारल्यास बँकेत भरण्यासाठी १ ऑक्टोबर उजाडेल. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून एसटी ४८ तास आधीच दोन हजाराच्या नोटेचा व्यवहार थांबविणार आहे. 

४८ तास आधीच२८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्यात आलेल्या नोटा २९ रोजी बँकेत भरल्या जातील. २९ रोजी स्वीकारलेल्या नोटा भरण्यासाठी एक दिवस एसटीकडे आहे. जोखीम न घेता एसटीने ४८ तास आधीच अकाउंट क्लोज करण्याचा निर्णय घेतला आहे.

नोटा २९ ला जमा करण्याचा आदेश

२८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा महामंडळाकडे येऊच नये यासाठीची संपूर्ण जबाबदारी विभागावर टाकण्यात आली आहे. अंमलबजावणी विभाग नियंत्रकांना करायची आहे. २८ च्या मध्यरात्रीपर्यंत आलेल्या दोन हजारच्या नोटा २९ ला बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्थातच यासाठी ३० तारखेची वाट पाहायचीच नाही.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ