शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयानंतरही विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 14:58 IST

२०२० साठी पीक कर्ज द्यावे व थकबाकीची रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी, सदर रक्कमेवर बँकांना प्राप्त होणाऱ्या दिनांकापर्यंत व्याज आकारणी करावी, संबंधित बँकांना निधी व्याजासह देण्यात येईल, असे बँकांना कळविण्यात आले. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी सुरु झाली नाही.

ठळक मुद्दे‘आरबीआय’च्या परवानगीसाठी अडले घोडेराज्याचा केंद्राकडे पाठपुरावा

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमुक्तीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी राज्य सरकारने हमीची तयारी दर्शविली. तसा शासन निर्णय निर्गमित केला. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा तिढा अद्याप कायमच आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्याचा निर्णय २४ डिसेंबर २०१९ च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याअंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत घेतलेले अल्प मुदतीचे पीक कर्ज, पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील ३० सप्टेंबर २०१९ रोजी दोन लाख रुपयांपर्यंत थकीत व परतफेड न झालेली रक्कम असलेल्या १९ लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला.उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कारवाई सुरू आहे. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मधल्या काळात विदर्भातील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देता आला नाही. नंतर मार्चमध्ये योजनेची अंमलबजावणी सुरु असताना कोविड-१९ च्या संकटामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. या साथीच्या रोगांमुळे राज्याचे उत्पन्न स्त्रोतही रोडावले. उपलब्ध निधी कोरोनावरील उपाययोजनेसाठी वळविण्यात आला. त्यामुळे उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे तूर्तास शक्य नसल्याचे वित्त विभागाने कळविले. यामुळे पात्र लाभार्थी थकीत राहून नवीन पीक कर्जापासून वंचित राहू नये म्हणून राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला.राज्य शसनाच्या निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता खरीप २०२० साठी पीक कर्ज द्यावे व थकबाकीची रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी, सदर रक्कमेवर बँकांना प्राप्त होणाऱ्या दिनांकापर्यंत व्याज आकारणी करावी, संबंधित बँकांना निधी व्याजासह देण्यात येईल, असे बँकांना कळविण्यात आले. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी सुरु झाली नाही. यासाठी बँकांना रिझर्व्ह बँकेची परवानगी लागणार आहे. तशी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे कर्जमुक्तीचा तिढा अद्याप कायमच आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री स्वत: केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे कर्जमुक्तीपासून वंचित राहिलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ मिळून तत्काळ पीक कर्ज मिळेल, अशी अपेक्षा आहे.- संजय राठोडपालकमंत्री, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती