शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

एकाचा मृत्यू, ४६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

गुरुवारी दगावलेली ५८ वर्षीय महिला पुसद शहरातील रहिवासी होती. पॉझिटिव्ह आलेल्या ४६ जणांमध्ये २७ पुरुष आणि १९ महिला आहेत. सर्वाधिक दहा रुग्ण नेर तालुक्यात आढळले. त्या खालोखाल आठ रुग्ण यवतमाळ शहरात आढळले. त्यात लोखंडीपूल येथील एक पुरुष, तेलीपुरातील दोन पुरुष, गोदाम फैलातील एक महिला, शास्त्रीनगरातील एक पुरुष, कुंभारपुरातील एक पुरुष व अन्य भागातील दोन महिला व एक पुरुष पॉझिटिव्ह आले.

ठळक मुद्देकोरोना ब्लास्ट : सर्वाधिक १० नेरमध्ये तर यवतमाळात ८ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा ब्लास्ट झाला आहे. गुरुवारी आणखी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला, तर नव्याने ४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४० मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी २९ मृतक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहे.गुरुवारी दगावलेली ५८ वर्षीय महिला पुसद शहरातील रहिवासी होती. पॉझिटिव्ह आलेल्या ४६ जणांमध्ये २७ पुरुष आणि १९ महिला आहेत. सर्वाधिक दहा रुग्ण नेर तालुक्यात आढळले. त्या खालोखाल आठ रुग्ण यवतमाळ शहरात आढळले. त्यात लोखंडीपूल येथील एक पुरुष, तेलीपुरातील दोन पुरुष, गोदाम फैलातील एक महिला, शास्त्रीनगरातील एक पुरुष, कुंभारपुरातील एक पुरुष व अन्य भागातील दोन महिला व एक पुरुष पॉझिटिव्ह आले. तसेच दारव्हा येथील एक पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष तसेच तालुक्यातील अर्ली येथील पाच महिला व एक पुरुष, पुसद तालुक्यातील पार्डी येथील एक पुरुष, एक महिला, श्रीरामपूर येथील एक महिला, पुसदच्या राजे ले-आऊटमधील एक महिला, आंबेडकर वार्डातील एक पुरुष, वसंतनगरातील एक पुरुष याशिवाय पुसद शहरातील एक महिला व दोन पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत. उमरखेडच्या मरसूळ येथे दोन पुरुष व एक महिला तर ढाणकीत एक पुरुष, एक महिला कोरोनाबाधित झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले.दरम्यान ८० रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना गुरुवारी सुटी देण्यात आली. तर दोन रुग्णांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. सध्या जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२३ आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात १२५ जण भरती आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या