शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाचा बुडून मृत्यू

By admin | Updated: August 10, 2014 23:12 IST

वर्षातून एकदा येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाला माहेरी जाऊन भावाच्या हाताला राखी बांधण्याची आस प्रत्येकच बहिणीला असते. मात्र वणी तालुक्यातील रांगना येथे रक्षाबंधनासाठी आलेल्या एका बहिणीवर

रवींद्र चांदेकर - वणीवर्षातून एकदा येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाला माहेरी जाऊन भावाच्या हाताला राखी बांधण्याची आस प्रत्येकच बहिणीला असते. मात्र वणी तालुक्यातील रांगना येथे रक्षाबंधनासाठी आलेल्या एका बहिणीवर भावाचे कलेवरच पाहण्याची दुर्दैवी वेळ आली. लाडक्या भावाचा रक्षाबंधनाच्या दिवशीच डोहात बुडून मृत्यू झाल्याने तिच्या दु:खाला पारावार उरला नाही. संजय गंगाधर पाऊणकर (१९) असे मृत भावाचे नाव आहे. तो वणी तालुक्यातील रांगना येथील रहिवासी आहे. शनिवारी सकाळी तो आपल्या शेतात कामासाठी गेला होता. जेवण केल्यानंतर संजय वर्धा नदीवर दुपारी ३ वाजताच्या सुमारास पाणी पिण्यासाठी गेला. आपल्याजवळील डबकीत पाणी भरत असताना अचानक वर्धा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. आलेल्या मोठ्या लोंढ्यासोबत संजय वाहून गेला. त्याची गावकऱ्यांनी शोधाशोध केली. मात्र थांगपत्ता लागला नाही. इकडे त्याची विवाहित बहीण सपना वणी तालुक्यातील वांजरी येथून राखी बांधण्यासाठी राखी घेऊन रांगनात पोहोचली. मात्र तिला भाऊ वर्धा नदीत वाहून गेल्याची वार्ता कळली. या प्रकाराने संपूर्ण गावच हादरुन गेले. शोध घेऊनही संजयचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर महसूल प्रशासनाने रविवारी यवतमाळवरून आपत्ती निवारण कक्षाच्या बचाव पथकाला पाचारण केले. या पथकाने त्याचा शोध सुरू केला. अख्खा गाव वर्धा नदीच्या तीरावर गोळा झाला होता. दरम्यान रविवारी सायंकाळच्या सुमारास संजयचा मृतदेह रांगनानजीकच्या डोहात आढळून आला. रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीवर नियतीने दुर्दैवी वेळ आणली. तिने सोबत आणलेली राखी तशीच राहिली. सायंकाळी शोकाकूल वातावरणात संजयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी बहिणीने फोडलेला टाहो अनेकांच्या हृदयाला चिरुन गेला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला आपल्या भावाचे कलेवर पाहण्याची दुर्दैवी वेळ आली. गावातील प्रत्येक जण हळहळत होता.