दारव्हा : येथील सुसज्ज आणि सर्व सुविधायुक्त न्यायालयीन इमारतीला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश डी.आर. शिरासाव होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे प्रशासक आशीष देशमुख, जिल्हा न्यायाधीश के.व्ही. सेदाणी, जिल्हा न्यायाधीश ए.आर. लाहोटी आदी उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. संचालन वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. ए.व्ही. चिरडे, प्रास्ताविक अध्यक्ष अॅड. एम.डी. राजगुरे यांनी, तर आभार अॅड. खंडारे यांनी मानले.सोहळ्याला न्या. आर.आर. शेख, न्या. टी.टी. आगलावे, न्या. केकान, न्या. केतनकुमार तेलगावकर, न्या. पी.बी. जोशी, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एम.जी. ठाकरे, दिग्रस वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रवी गावंडे आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी अॅड. एस.पी. देशपांडे, अॅड. बी.बी. राऊत, अॅड. गोविंदराव भेंडे, अॅड. टी.एम. खान, अॅड. आर.डी. जाधव, अॅड. डी.आर. राऊत, अॅड. टी.एम. मलनस, अॅड. साजीद वर्षाणी, अॅड. सुनील व्यवहारे, अॅड. विलास सोनोने, अॅड. एम.आर. चव्हाण, अॅड. एस.ए. बल्लाळ, अॅड. एस.आर. चव्हाण, अॅड. हर्षवर्धन पापळकर, अॅड. नितीन जवके, अॅड. मनोज कावळे, अॅड. संदीप खिवसरा, अॅड. अभिजित रोडे, अॅड. आर.के. मनवर, अॅड. डी.बी. निमकर, अॅड. शरद राठी, अॅड. सचिन गोरले, अॅड. पी.बी. भगत, अॅड. राहुल नाकट, अॅड. आशीष वानखडे, अॅड. संदीप उके, अॅड. नितीन ठाकरे, अॅड. मजहर खान, अॅड. जाबीर खान, अॅड. कथले, अॅड. कांबळे, अॅड. चव्हाण, अॅड. शर्मा आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)
दारव्हा न्यायालय इमारतीची वर्षपूर्ती
By admin | Updated: October 9, 2016 00:13 IST