शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

दारव्हा ठाणेदारासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST

दारव्हा ठाणेदार यशवंत बाविस्कर, पोलीस उपनिरीक्षक सुनील विसपुते, जमादार पुरुषोत्तम बावने, जमादार संजय मोहतुरे, शिपाई सचिन जाधव, चालक शब्बीर पप्पूवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली. यातील पुरुषोत्तम बावने, संजय मोहतुरे, सचिन जाधव, शब्बीर पप्पूवाले या चौघांविरूद्ध मारहाणीची तक्रार मृत शेख इरफान यांचा भाऊ शेख जमीर याने दिली आहे. या तक्रारीची चौकशीही केली जात आहे.

ठळक मुद्देयुवकाचे मृत्यूप्रकरण : पुसदच्या मस्के यांना आणले दारव्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलाला हादरविणारी घटना दारव्हा येथे घडली. पोलीस ठाण्यात ताब्यात घेतलेल्या युवकाचा मृत्यू झाला. यानंतर जनक्षोभ उसळून ठाण्यावर दगडफेक झाली. यात पोलीस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दारव्हा ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्यासह सहा जणांना कसुरीवरून नियंत्रण कक्षात बसविण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी बुधवारी हा आदेश जारी केला.दारव्हा ठाणेदार यशवंत बाविस्कर, पोलीस उपनिरीक्षक सुनील विसपुते, जमादार पुरुषोत्तम बावने, जमादार संजय मोहतुरे, शिपाई सचिन जाधव, चालक शब्बीर पप्पूवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली. यातील पुरुषोत्तम बावने, संजय मोहतुरे, सचिन जाधव, शब्बीर पप्पूवाले या चौघांविरूद्ध मारहाणीची तक्रार मृत शेख इरफान यांचा भाऊ शेख जमीर याने दिली आहे. या तक्रारीची चौकशीही केली जात आहे. पोलिसांकडून पुढील कारवाईसाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. शेख इरफान याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शवचिकित्सा अहवालातूनच उघड होणार आहे. शरीरावरील पंचनाम्यात वरकर्णी कुठेही गंभीर स्वरूपाची मारहाण असल्याचे आढळले नाही, असे सांगण्यात येत आहे. मात्र, शरीरात अंतर्गत दुखापत झाल्याने मृत्यू झाला काय, हे शवचिकित्सा अहवालातूनच स्पष्ट होणार आहे. दारव्हा प्रकरणात तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर या घटनेच्या तपासाची दिशा ठरणार आहे.या घटनेला जबाबदार धरून दारव्हा ठाणेदारासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सर्वांवरच कर्तव्यात कसुरीचा ठपका ठेवत त्यांना नियंत्रण कक्षात, तर जमादार व शिपायांना पोलीस मुख्यालयात आणण्यात आले आहे. दारव्हा ठाण्याची सुत्रे पुसद शहरचे ठाणेदार सुरेश मस्के यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. एकंदर या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासन खुद्द पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिले आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली