शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

दारव्हा रोडच्या देहविक्री नेटवर्कची अनेकांना भुरळ

By admin | Updated: February 13, 2016 02:11 IST

शहरातील देहविक्रीच्या नेटवर्कमध्ये दारव्हा मार्गाची वेगळीच ओळख आहे. येथील एका अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ््यावर या नेटवर्कचे सर्व्हर आहे.

ग्रामीण रसद : शिस्तीच्या खात्यातीलच म्होरक्यायवतमाळ : शहरातील देहविक्रीच्या नेटवर्कमध्ये दारव्हा मार्गाची वेगळीच ओळख आहे. येथील एका अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ््यावर या नेटवर्कचे सर्व्हर आहे. येथूनच ग्रामीण भागातून आलेल्या मुलींना वाममार्गाला लावण्यात येते. बऱ्याचदा शासकीय नोकरीचे अमीष दाखविले जात आहे. मात्र आतापर्यंत अधिकृतपणे कुणीच तक्रार केली नसल्याने सर्वकाही बिनबोभाट सुरू आहे. देहविक्रीच्या व्यवसायाला शिस्तीच्या खात्यातूनच पाठबळ मिळत आहे. अपार्टमेंटमधील फ्लॅट एका कर्मचाऱ्याच्या मालकीचा असल्याचे सर्वश्रृत आहे. या ठिकाणी हा व्यवसाय जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील मुलींचे नेटवर्क सांभाळण्याचा धंदा सेवेतीलच तीन महिला बजावत आहेत. त्यांच्या कामाची व गिऱ्हाईक शोधण्याची वेगळीच पद्धत आहे. यंत्रणेतील माहिती असल्यामुळे अद्यापपर्यंत येथे एकदाही कारवाई झालेली नाही. हे नेटवर्क हॅक करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा झाला. मात्र आर्थिक देवाण-घेवाणीचा अ‍ॅन्टीव्हायरस प्रभावीपणे वापरला जातो. महिन्याकाठी २० हजार रुपये रक्कम मोजण्यात येते. सीटी ते ग्रामीण आणि रोडवरच्या ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या सहकारातून हे नेटवर्क उभारण्यात आले आहे. याची व्याप्तीही फार मोठी आहे. सोशल मीडियाव्दारे बैठक फिक्स झाल्यानंतर फ्लॅटवर प्रवेश मिळतो. आंबटशौकीनांमध्ये याची सध्या चांगलीच क्रेझ आहे. याशिवाय नामांकित व्यक्तींच्या वास्तव्य असलेल्या परिसरातील अड्ड्यानेही चांगलाच जोर पकडला आहे. प्रत्येकजण कानोकानी याची माहिती पुरविण्याचे काम करत आहे. नवीन काही म्हणून येथे येणाऱ्यांची संख्याही वाढतच आहे. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात या जाळ््यात ओढल्या जात आहे. दुर्दैवाने दाट वस्ती व वर्दळ असलेल्या भागांमध्येही वैयक्तिक स्वरुपाचे व्यवसाय आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागच्या भागातील अपार्टमेंटही आता चर्चेत आले आहे. एकंदरच ठराविक वस्त्यांपुरता मर्यादित असलेला हा व्यवसाय आता शहराच्या विविध भागात फोफावला आहे. यावर नियंत्रणासाठी अजूनपर्यंत कुठलीही ठोस कारवाई झाली नाही. तसा प्रयत्नही करण्यात आला नाही.