मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेमुळे बदल झालेल्या शाळांच्या पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनमध्ये (पीपीपी) दारव्हा येथील नगरपरिषद मराठी शाळा क्र.२ ही राज्यात चमकली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने स्कूल लिडरशीप नेटवर्क कॉन्फरन्सची यादी नुकतीच जाहीर केली असून त्यामध्ये या शाळेने राज्यात सहावा क्रमांक पटकाविला आहे.उल्लेखनीय म्हणजे, हे यश प्राप्त करणारी ही यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव शाळा असून या कामगिरीमुळे दारव्हासारख्या छोट्या शहरातील शाळेला राज्यस्तरावर राज्य व भारत सरकारच्या सचिवांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यात १०० टक्के मुले शिकण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणा स्वयंप्रेरणेने काम करीत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात १०० टक्के मुले शिकणाºया शाळांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शाळांची गुणवत्ता व मुलांची शैक्षणिक प्रगती दिसून येत असल्याने समाज शाळांना भरीव योगदान देत आहे. आतापर्यंत शाळांना लोकसहभागातून ३१८ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून त्यातून ५२ हजार शाळा डिजिटल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मराठी माध्यमांच्या शाळांच्या सुधारणेमुळे इंग्रजी माध्यमातून या माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना दाखल करण्याचा कल पालकांमध्ये वाढल्याचे चित्र आहे. अर्थात असे असले तरी या उपक्रमांतर्गत चांगले बदल झालेल्या शाळांची कामगिरी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. पटसंख्येत झालेली भरीव वाढ, उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता यामुळे सदरचे बदल झाले असून शाळांनी हे यश कसे मिळविले व त्यात कुणाचा सहभाग मोलाचा ठरला याची केसस्टडी व सादरीकरण याबाबतची व्हिडिओ क्लिप निवड झालेल्या राज्यातील ३५ शाळांकडून मागविण्यात आली आहे.या ३५ शाळांच्या यादीत दारव्हा नगरपरिषद शाळेचा सहावा क्रमांक आहे. वर्ग आठवीपर्यंत शिक्षणाची सोय असणाºया या शाळेत एक हजार १०३ विद्यार्थी आहेत. सुसज्ज इमारत, मोठा परिसर, खेळाचे मैदान, पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज, शौचालय, बगीचा, डिजिटल क्लासरूम, पोषण आहार खोली, ध्वनिक्षेपक, अग्नीशमन यंत्र आदी पायाभूत सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत. संपादणूक स्तर बी-प्लस, लोकसहभाग चांगला, त्यामुळे पूर्वीच्या व आजच्या परिस्थितीत मोठा फरक असून यासाठी पटसंख्या संपादणूक व इमारत हा मोठा फरक आहे. उपक्रम, प्रयत्न व निर्णय यामुळे हा बदल घडला आहे. याप्रमाणे याशाळेने आपले सादरीकरण तयार केले असून शिक्षकांना राज्यस्तरावर ते सादर करण्याची संधी मिळणार आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत शासकीय शाळांचा टिकाव लागणे कठीण बनले असताना या शाळेने मात्र शैक्षणिक गुणवत्ता व सुविधा यामुळे दर्जा कायम ठेवला आहे. त्यामुळे या शाळेला ही संधी आता प्राप्त झाली आहे.शिक्षकांचे परिश्रम फळालानगरपरिषदेच्या मराठी चार व उर्दू माध्यमाच्या तीन अशा सातही शाळा दर्जेदार शिक्षणासाठी अव्वल आहेत. एका शाळेने आयएसओ दर्जा मिळविला, तर उर्दू शाळेच्या डिजिटल क्लासरूमचे जिल्ह्यात कौतुक झाले. सर्व शाळांना सुरुवातीपासूनच नगरपरिषदेकडून चांगले पाठबळ मिळत असल्याचीच ही पावती आहे. गुणवत्तेच्या बाबतीत मात्र शिक्षकांचे परिश्रम खºया अर्थाने महत्त्वाचे ठरले आहे. मराठी शाळा क्र.२ चे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटतात. त्यांचे परिश्रम राज्यस्तरावर मिळविलेल्या यशामुळे फळाला लागल्याचे दिसून येते.
दारव्हा नगरपरिषदेची शाळा राज्यात चमकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 21:51 IST
उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेमुळे बदल झालेल्या शाळांच्या पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनमध्ये (पीपीपी) दारव्हा येथील नगरपरिषद मराठी शाळा क्र.२ ही राज्यात चमकली आहे.
दारव्हा नगरपरिषदेची शाळा राज्यात चमकली
ठळक मुद्दे जिल्ह्यातील एकमेव शाळा : राज्यस्तरावर मिळणार सादरीकरणाची संधी