शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा, आर्णी, राळेगाव, बाभूळगाव, घाटंजीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 21:37 IST

आॅनलाईन आणि रिटेल एफडीआयविरुद्ध व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला दारव्हा, आर्णी, घाटंजी, राळेगाव व बाभूळगाव येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देव्यापारी संतापले : आॅनलाईन शॉपिंगला विरोध, कराविरूद्ध रोष

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा/आर्णी/घाटंजी/बाभूळगाव/राळेगाव : आॅनलाईन आणि रिटेल एफडीआयविरुद्ध व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला दारव्हा, आर्णी, घाटंजी, राळेगाव व बाभूळगाव येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला.आॅनलाईन शॉपिंग, एफडीआयमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणूक, वॉलमार्ट व फ्लिपकार्ट आणि ई-फार्मसीची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच तुरुंगवास व दंडाची रक्कम कमी करावी, जीएसटीव्यतिरिक्त सर्व कर बंद करावे, पाच लाखांपर्यंत इन्कम टॅक्समध्ये सूट द्यावी आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.आर्णीत चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, भिकू पटेल, कचरूसेठ दुगड, रियाज बेग, प्रमोद कोट्टावार, पवन कोषटवार, संदीप लोळगे, अमीत किनकर, संदीप अंधुरे, पवन पनपालिया, करुण भंडारी, सुनील व्होरा, चिराग शहा, प्रशांत बोम्पिलवार आदींनी बंदसाठी परिश्रम घेतले. व्यापारी बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून मोर्चाने तहसीलवर धडक दिली. तेथे नायब तहसीलदार आर.ई. डेकाटे यांना निवेदन दिले.दारव्हा येथे सकाळीच सर्व व्यापारी बांधव शिवाजी चौकात गोळा झाले. तेथून त्यांनी मोर्चाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात शहरातील व्यापारी सहभागी होते. त्यांनी उपविभागीय अधिकाºयांना निवेदन सादर केले.घाटंजीत व्यापारी बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेऊन प्रशासनाला निवेदन सादर केले. सर्व व्यापारी मोर्चाने तहसीलवर धडकले. तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.राळेगाव व बाभूळगावमध्ये औषधी विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. शहरासह दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील औषधी दुकाने बंद होती.

टॅग्स :GSTजीएसटीonlineऑनलाइन