शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे २० कोटींवर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त आहे. वन कायद्यामुळे शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा बंदोबस्तही करता येत नाही. सामान्य शेतकरी पिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. यातूनच शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षात एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रोही, रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये धुडगूस घालून एक लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान केले.

ठळक मुद्देचार वर्षातील आकडेवारी : वनविभागाने शेतकऱ्यांना अदा केली नुकसान भरपाई

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जंगलात मोठ्या प्रमाणावर रानडुक्कर व रोह्यांची संख्या आहे. जंगलाला लागून असलेल्या शेतशिवारात या दोनही प्राण्यांचा कायम धुडगूस असून गेल्या चार वर्षात या वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांचे २० कोटी २९ लाख ६४ हजार २३१ रूपयांचे नुकसान केले आहे. यात कापूस, सोयाबीन, तूर ही पिके या वन्यप्राण्यांनी नेस्तनाबूत केली आहे.वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त आहे. वन कायद्यामुळे शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा बंदोबस्तही करता येत नाही. सामान्य शेतकरी पिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. यातूनच शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षात एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रोही, रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये धुडगूस घालून एक लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान केले. सन २०१६-१७ मध्ये चार लाख नऊ हजार ९५० रूपयांचे नुकसान झाले. सन २०१७-१८ मध्ये २० कोटी १६ लाख ४६ हजार, २०१८-१९ मध्ये सहा लाख ५६ हजार ४१, तर सन २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत ६७ हजारांचे नुकसान झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. चार वर्षात असे एकूण २० कोटी २९ लाख ६४ हजार २३१ रूपयांचे नुकसान झाले.पूर्वी जंगलांमध्ये वन्यप्राणी होते. या वन्यप्राण्यांच्या शिकारीही मोठ्या प्रमाणावर केल्या जायच्या. परंतु पुढे वनविभागाच्या कठोर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. परिणामी शिकारीवर बंधने आलीत. वन्यजीवांच्या रक्षणासाठी वनविभागाने कठोर पाऊल उचलले. यातून वन्यप्राण्यांची संख्याही वाढत गेली. वनसंवर्धनासाठी वन्यजीवांचा साखळी संतुलीत राहावी, यासाठी प्रयत्न होत असले तरी रोही, रानडुकरांसारख्या प्राण्यांची झालेली वाढ मात्र शेतकºयांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली.गेल्या काही वर्षात वन्यप्राण्यांनी शेतशिवारात प्रचंड धुमाकूळ चालविला. शेतात पीक वाढले की, रोही, रानडुक्कर हे वन्यप्राणी कळपाने शेतात शिरून पिकांची नासाडी करत आहे. त्यातून शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मात्र ज्या प्रमाणात नुकसान होते, त्या प्रमाणात भरपाई मिळत नाही.वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी विविध क्लृप्त्यावन्यजीवांच्या धुमाकूळामुळे पिकांचे नुकसान होत आहे. असे असले तरी या प्राण्यांना कायद्यानुसार ठार मारता येत नाही. त्यामुळे शेतकरी या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी विविध युक्त्या वापरत आहे. अनेक ठिकाणी रंगीबेरंगी साड्यांचे कुंपण केल्याचे दिसून येते.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग