शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

दुग्ध व्यवसाय डबघाईस

By admin | Updated: January 3, 2015 02:14 IST

चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाढती महागाई आणि अल्प उत्पादनाचा हा परिणाम आहे. यामुळेच दुभत्या जनावरांची संख्या घटत चालली आहे.

नेर : चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाढती महागाई आणि अल्प उत्पादनाचा हा परिणाम आहे. यामुळेच दुभत्या जनावरांची संख्या घटत चालली आहे. परिणामी शेतकऱ्यांचा जोडधंदा दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे. पाकिटचे दूध खेड्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे लोकांना ताज्या दुधाला मुकावे लागत आहे. हिरव्या वैरणावर तणनाशकांचा मारा हे कारणही दुग्ध व्यवसायासाठी मारक ठरत असल्याचे सांगितले जाते.कडबा, कुटार आणि सिंचनाची सोय असल्यास कडावू हा जनावरांसाठीचा मुख्य चारा आहे. परंतु आता ज्वारीचा पेरा कमी झाला आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रात कडबा, कुटार सापडला आहे. सोयाबीन पावसात सापडल्याने ओले झाले. परिणामी ते जनावरांना खाण्यायोग्य राहिले नाही. शेतधुऱ्यावर वाढणारा चारा तणनाशकाच्या कचाट्यात सापडला जातो. शेतात असलेल्या पिकांवर होणारी फवारणी अप्रत्यक्षरीत्या या चाऱ्यावर परिणाम करते. पावसाळ्यापासून तर हिवाळ्यापर्यंत जवळपास सात ते आठ महिने मिळणारा चारा आता काही दिवसातच संपुष्टात येत आहे. हक्काचे वैरण अल्पावधीतच संपत असल्याने पशुपालकांसमोर चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यातूनच जनावरे विकण्याचा सपाटा सुरू आहे. एकेकाळी घरोघरी असलेले दूधदुभत्याचे भंडार आता हळूहळू कमी होवू लागले आहे. सर्वत्र दुधाची टंचाई जाणवत असल्याचे वास्तव आहे. मजूर टंचाईमुळे शेतातील तण काढणे कठीण होते. त्यामुळे शेतकरी वर्ग तणांवर फवारणी करतात. याच बाबीही वैरण टंचाईसाठी कारणीभूत ठरत आहे. रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे जमिनीचाही पोत बिघडत चालला आहे. मानवी जीवनावरही त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहे. तणनाशकाच्या अतिरिक्त वापरावर नियंत्रणाची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)