लोकमत न्यूज नेटवर्क मुकुटबन : गेल्या दीड महिन्यापूर्वी मुकुटबन येथील राजराजेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून हजारो रूपयांचा ुमुद्देमाल लंपास करणाऱ्या तीन चोरट्यांना मुकुटबन पोलिसांनी अटक केली आहे. रंगा शंकर चिंतलवार (४०), खुशाल रामा दांडेकर (४५) व अशोक येलाजी लोणारे (२३) असे अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. गेल्या ३० एप्रिल रोजी येथील राजराजेश्वर मंदिराची दानपेटी फोडून हजारो रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याच दरम्यान वणी तालुक्यातील वडजापूर येथील मंदिरातूनही दानपेटी लंपास झाली होती. त्या घटनेतही या चोरट्यांचा समावेश आहे. सर्वप्रथम शिरपूर पोलिसांनी या चोरट्यांना पकडून त्यांची कारागृहात रवानगी केली होती. तेथून सुटताच मुकुटबन पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, मुकुटबनच्या चोरीचीही त्यांनी कबुली दिली. या चोरट्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पडघन, अशोक नैताम, संदीप सोयाम करीत आहे.
दानपेटी फोडणारे चोरटे गजाआड
By admin | Updated: June 14, 2017 00:22 IST