एक जण भाजला : आयुर्वेद महाविद्यालयातील परिसरातील घटना लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील आयुर्वेदिक कॉलेज चौकातील विरेंद्र कलोसिया यांच्या घरी शुक्रवारी सिलिंडरचा भडका उडाला. यात त्यांचे घर खाक झाले असून विरेंद्र भाजले गेले. शेजाऱ्यांनी लगेच धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. इंडियन गॅस एजंसीकडून बुक कलेले सिलिंडर शुक्रवारी कलोसिया यांच्या घरी पोहोचले. ते सिलिंडर त्यांनी लगेच किचनमध्ये लावले. मात्र सदर सिलिंडर लिक होते. त्यामुळे शेगडी पेटविण्यासाठी त्यांनी लायटर लावताच गॅसचा मोठा भडका उडाला. यात विरेंद्रला आगीने आपल्या विळख्यात घेतले. यात त्यांचा चेहरा मोठ्या प्रमाणात भाजला गेला. तोपर्यंत शेजारी धावून आल्याने पुढील अनर्थ टळला. आगीने लवकरच संपूर्ण स्वयंपाकघर काबीज केले. यात त्यांच्या घरातील फ्रिज, टीव्ही, स्वयंपाक घरातील इतर साहित्य, देवघरातील चांदीच्या वस्तू आणि काही महत्त्त्वाची कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
सिलिंडरच्या भडक्यात घर खाक
By admin | Updated: May 13, 2017 00:23 IST