शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वीज बिल पाहून ग्राहकांना बसतोय शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिने लॉकडाऊन होता. आता काही प्रमाणात सूट मिळाली. वीज वितरणने मीटर रिडींग न घेताच ग्राहकांना तीन महिन्यांचे सरासरी बिल दिले. हे बिल बघून ग्राहकांचे डोळे विस्फारत आहे. ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प पडल्याने अनेक जण बेरोजगार झाले. सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले. परिणामी तीन महिन्यांच्या वीज बिलात काही प्रमाणात सूट मिळेल, अशी ग्राहकांना अपेक्षा होती. मात्र वीज कंपनीने सरासरी देयक देऊन ग्राहकांनाच शॉक दिला.

ठळक मुद्देपुसद, उमरखेड, दिग्रसमध्ये संताप : व्याज आणि दंडाला ग्राहकांचा कडाडून विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड/दिग्रस : लॉकडाऊनच्या काळात वीज वितरणने ग्राहकांना छापिल बिले दिली नाही. आता तीन महिन्यानंतर बिल दिले जात आहे. ही बिले बघून पुसद, उमरखेड, दिग्रस तालुक्यातील ग्राहकांना शॉक बसत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिने लॉकडाऊन होता. आता काही प्रमाणात सूट मिळाली. वीज वितरणने मीटर रिडींग न घेताच ग्राहकांना तीन महिन्यांचे सरासरी बिल दिले. हे बिल बघून ग्राहकांचे डोळे विस्फारत आहे. ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प पडल्याने अनेक जण बेरोजगार झाले. सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले. परिणामी तीन महिन्यांच्या वीज बिलात काही प्रमाणात सूट मिळेल, अशी ग्राहकांना अपेक्षा होती. मात्र वीज कंपनीने सरासरी देयक देऊन ग्राहकांनाच शॉक दिला.वीज वितरणने स्वत:हून मीटर रिडींगचे छायाचित्र घेऊन कंपनीच्या पोर्टलवर देयकाची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता छापिल बिले हाती पडताच ग्राहकांना शॉक बसत आहे. देयकावर दर्शविलेला वीज वापर आणि मीटरवरील रिडींगमध्ये तफावत आहे. त्यामुळे वीज वापर पाहून बिले द्यावी, अशी मागणी पुसदचे धनंजय सोनी यांनी केली.उमरखेडमध्ये ग्राहकांची होतेय कोंडीउमरखेडमध्येही ग्राहकांची कोंडी झाली. याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास देवसरकर यांनी तक्रारीतून समस्यांना वाचा फोडली. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्याने घरातील विजेची उपकरणे बिघडली. अनेकांचे टीव्ही, मिक्सर, फ्रिज आदींचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे मोटारपंप जळाले. त्यामुळे तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी केली. मात्र वीज वितरणने देयक बरोबरच असल्याचे सांगितले. तसेच तालुक्यात कुठेही घरातील वीज उपकरणे जळाली व मोटापंप जळाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचेही स्पष्ट केले.दिग्रस ग्राहक पंचायतचे वीज वितरणला निवेदनदिगस येथील ग्राहक पंचायतीने वीज वितरणला निवेदन देऊन बिलाचे हप्ते पाडून देण्याची मागणी केली. लॉकडाऊनमध्ये अनेकांची बिलाचा भरणा केला नाही. अशांकडे बिलाची रक्कम जास्त आहे. त्यांना बिल भरण्यासाठी दोन ते तीन हप्ते पाडून द्यावे, अशी मागणी उपविभागीय वीज वितरण कार्यालयाचे अधीक्षक संजय धावडे यांच्याकडे ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्रा.मतीन खान, सुनील हिरास यांनी एका निवेदनातून केली आहे.

 

टॅग्स :electricityवीज