शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कुलर ग्राहकांच्या प्रतीक्षेत अन् ग्राहक पाण्याच्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:22 IST

पाणी कोणत्याही आकारात स्वत:ला ‘अ‍ॅडजस्ट’ करून घेते. म्हणूनच आता पाणीटंचाईने यवतमाळकरांना ‘अ‍ॅडजस्टमेंट’ शिकवणे सुरू केले आहे. अर्धा मार्च उलटला तरी कोणाचेही कुलर खिडक्यांमध्ये अवतरलेले नाही.

ठळक मुद्देफुकटात विचारेना : पाणी टंचाईने बसविला कुलरचा धंदा, गतवर्षी मार्च अखेर २० टक्के कुलरची विक्री

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : पाणी कोणत्याही आकारात स्वत:ला ‘अ‍ॅडजस्ट’ करून घेते. म्हणूनच आता पाणीटंचाईने यवतमाळकरांना ‘अ‍ॅडजस्टमेंट’ शिकवणे सुरू केले आहे. अर्धा मार्च उलटला तरी कोणाचेही कुलर खिडक्यांमध्ये अवतरलेले नाही. तर कुलर विक्रेतेही हातावर हात देऊन बसलेले आहेत. गेल्यावर्षी मार्चमध्ये २० टक्के कुलर विक्री झालेली असताना यंदा मात्र पाच टक्केही कुलरचा उठाव झालेला नाही. भर उन्हात दुकानातील कुलर ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत अन् ग्राहक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.तापमानाने आता चाळीशीकडे वाटचाल सुरू केली आहे. रात्री उकाडा सतावू लागला आहे. तरीही अगतिक यवतमाळकर जनता कुलर वापरणे टाळत आहे. दरवर्षी होळी आटोपताच अडगळीतले कुलर झाडपूस करून खिडक्यांमध्ये उभे केले जातात. यंदा मार्च अर्धा संपला आणि तापमान वधारले तरी, कुलर अडगळीतच आहेत. २० दिवसांतून एकदा पाणी मिळणाऱ्या यवतमाळकरांना सध्या अंघोळीचे वांदे झालेले आहेत. अशावेळी कुलरसाठी दरदिवशी किमान २०० लिटर पाणी आणावे कुठून हा प्रश्न आहे.नागरिकांप्रमाणेच पाणीटंचाईने कुलरविक्रेत्यांनाही जोरदार फटका दिला आहे. यवतमाळात १५-२० कुलरविक्रेत्यांची दरवर्षी ‘सिझन’मध्ये चांदी असते. गेल्या वर्षी जानेवारीमध्येच सिझन सुरू झाला होता. यंदा अर्धा मार्च संपूनही कुलर विक्री झालेली नाही, अशी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.आता लग्नसराईवरच आशायवतमाळचे मार्केट दरवर्षी १० हजार डेझर्ट कुलर विक्री करते. यंदा मात्र दहा-विस कुलरही खपलेले नाही, अशी खंत एका विक्रेत्याने व्यक्त केली. मार्केटमधील एकूण कुलरपैकी अर्धे कुलर मार्चमध्येच संपून जातात. पण यंदा मे महिन्यापर्यंत ५० टक्केही कुलर घेतले जातील की नाही, अशी भीती विक्रेत्यांना वाटत आहे. लग्नात मात्र आहेर म्हणून प्रत्येक नवरीला कुलर दिला जातोच. त्याच भरवशावर यंदाचा सिझन आहे, असे मत एका विक्रेत्याने व्यक्त केले.डेझर्ट कुलर इन्स्टॉलमेंटवरयवतमाळप्रमाणेच नागपूर, अमरावतीसारख्या ठिकाणीही यंदा कुलरला उठाव नाही. एक विक्रेता म्हणाला, दरवर्षी मी डेझर्ट कुलर बनविण्यासाइी नागपुरातून माल बोलावतो. पण अ‍ॅडव्हान्स भरूनही वेळेवर माल मिळत नव्हता. यंदा मात्र मी मागणी न करताही माल येऊन पडला आहे. तणीस, खस, पंखे, बॉडी, मोटर या गोष्टी नुसत्या पडून आहे. जे कुलर तयार केले, तेही कुणी घ्यायला तयार नाही. आता हे कुलर इन्स्टॉलमेंटवर देण्याची मी तयारी केली आहे. मात्र इन्स्टॉलमेंटवरही न्यायला कुणी तयार नाही.