शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावच्या सांस्कृतिक भवनाचे काम रखडले

By admin | Updated: July 11, 2017 01:15 IST

येथील सांस्कृतिक भवनाचे काम गत आठ वर्षांपासून रखडले असून, एक कोटीचे बांधकामहोऊनही सदर भवन निरुपयोगीठरले आहे.

आठ वर्षांपासून प्रतीक्षा : नगरपंचायत झाल्याने कामाकडे दुर्लक्षके. एस. वर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : येथील सांस्कृतिक भवनाचे काम गत आठ वर्षांपासून रखडले असून, एक कोटीचे बांधकाम होऊनही सदर भवन निरुपयोगी ठरले आहे. विशेष म्हणजे नगरपंचायत झाल्यापासून जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. राळेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अगदी समोर आणि तहसील व बाजार समितीला लागून असलेल्या एक एकरापेक्षा अधिक जागेवर सांस्कृतिक भवन उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांच्या या जागेवर जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला. गत आठ वर्षांपासून या भवनाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भवन कधी पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तत्कालिन मंत्री वसंतराव पुरके यांच्या कार्यकाळात या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. सात-आठ वर्षात दरवर्षी दहा लाख रुपये एवढी तोकडी तरतूद करण्यात आली. त्या काळात बांधकाम मूल्य सतत वाढत असल्याने काम पूर्णत्वास गेले नाही. सध्यास्थितीत या इमारतीचा सांगाडा तेवढा शिल्लक दिसत आहे. भटके लोक धर्मशाळा आणि निवाऱ्यासाठी त्याचा उपयोग करतात. दीड वर्षापूर्वी राळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. त्यामुळे ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारितील जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. तर नगरपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधी याच्यात समन्वय दिसत नाही. त्यामुळे सातत्याने पाठपुरावा झाला नाही. आता ही इमारत कधी पूर्ण होईल आणि नागरिकांच्या उपयोगात कधी येईल याबाबत कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. ठेकेदार, अधिकारी, पदाधिकारी यांचे यात भले झाले असले तरी मुळ उद्देश मात्र पूर्ण झालेला नाही. संबंधित विभागाने या सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी राळेगाव येथील जनता करीत आहे.