शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

सूत गिरणीतील भ्रष्टाचार खणणार

By admin | Updated: September 27, 2015 02:00 IST

वणीच्या इंदिरा सहकारी सूत गिरणीच्या विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून निवडणूक लढविली...

भाजप आमदाराची घोषणा : शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप वणी : वणीच्या इंदिरा सहकारी सूत गिरणीच्या विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून निवडणूक लढविली. मित्र पक्षांच्या सहकार्याने निवडणुकीत बहुमतही प्राप्त केले. सूत गिरणीचे प्रवर्तक म्हणवून घेणाऱ्या माजी आमदाराला मतदारांनी नाकारले. मात्र शिवसेनेच्या एका स्वार्थी संचालकाने ऐनवेळी दलबदलूपणा करून मला अध्यक्षपदापासून दूर ठेवले. हा माझा विश्वासघात नसून, ज्या शेतकरी मतदारांनी आमच्यावर भक्कम विश्वास दाखविला त्यांचा विश्वासघात असल्याचा आरोप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शुक्रवारी येथील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला.मागील २५ वर्षांत सूत गिरणीच्या आर्थिक व्यवहारामध्ये प्रचंड घोळ होत असून तो बाहेर येऊ नये, यासाठी २५ लाख रूपयांची आर्थिक उलाढाल करून माजी आमदार कासावार यांनी नैतिकतेचा ऱ्हास करून सत्ता काबिज केल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. या उलाढालीत फुटीर संचालकासोबतच एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा वाटा असल्याचा घणाघाती आरोप बोदकुरवार यांनी केला. भाजपा, शिवसेना, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँगे्रसचा नाराज गट मिळून सूत गिरणीवर ११ संचालक निवडून आले. त्यामुळे बहुमत असल्याने आमदार बोदकुरवार हे अध्यक्ष व शिवसेनेचा उपाध्यक्ष होणार, हे स्पष्ट झाले होते. मात्र माजी आमदार कासावार यांच्या मुत्सद्दी चतुराईने आमदार बोदकुरवार यांचा डाव मोडला. त्याची कारणमीमांसा करण्यासाठी आमदारांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. लोकांच्या आग्रहाने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत गिरणीला आर्थिक सहाय्य करण्याचा शब्द दिल्याने मी सूतगीरणीची निवडणूक लढविली, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या दोन वर्षात सूत गिरणीही सुरू करण्याचे स्वप्न होते. मात्र आता विरोधी गटात असलो, तरी सूत गिरणी सुरू करण्याचे प्रयत्न झाल्यास त्याला विरोध करणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. मात्र गेल्या २५ वर्षांत सूत गिरणीत झालेला भ्रष्टाचार हुडकून काढण्याची घोषणाही त्यांनी केली. गेल्या १२ व १३ मार्चला दोनच दिवसात ४०० शेतकऱ्यांची प्रत्येकी २५ हजार रूपयांची पावती फाडून त्यांना सभासद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पावत्यांवर शेतकऱ्यांचे पूर्ण नावसुद्धा नाही. तसेच शेतकऱ्यांची स्वाक्षरीही नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वामनराव कासावार यांनी एक कोटीचे भाग भांडवल जमा दाखवून त्याचा खर्चही दाखवून टाकला. सूत गिरणीच्या इमारत बांधकाम, रस्त्यांच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार बोदकुरवार यांनी सांगितले. मी सुद्धा त्यांच्याकडील एखाद्या संचालकाला आपल्याकडे ओढू शकलो असतो. मात्र मला नैतिक मूल्यांचा ऱ्हास करून राजकारण करायचे नव्हते. अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविण्यासाठी मित्र पक्षांच्या नेत्यांची तीनदा बैठक घेण्यात आली. या बैठकांना येण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी सतत टाळाटाळ केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजपाला वाढू द्यायचे नाही, असे नांदेकर यांचे मत असल्याचे विठ्ठल झाडे यांनी सभेत सांगितल्याचा दावाही त्यांनी केला. तेव्हाच माझा पराजय मला दिसला. मात्र पुन्हा आपल्यावर अर्ज न भरण्याचा बालंट येऊ नये म्हणून अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (स्थानिक प्रतिनिधी)अध्यक्षपदाला कातकडे पात्र नाहीनैतिकता बाजूला ठेवून व पैशाचा वापर करून अध्यक्षपद मिळविणारे सुनील कातकडे हे संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार अध्यक्षपदाला पात्र नाही, असा दावा आमदार बोदकुरवार यांनी केला आहे. त्यांचा कापूस जिनिंगचा व्यवसाय आहे. ते वणी येथील साईकृपा जिनिंगचे प्रोप्रायटर आहेत. त्यामुळे ते सूत गिरणीचे अध्यक्ष होेण्यास अपात्र आहे. आम्ही याबाबतची तक्रार करून त्यांना अध्यक्षपदावरून काढून टाकण्याची मागणी करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.यापुढे शिवसेनेशी कधीही युती नाहीवणी विधानसभा क्षेत्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत यापुढे शिवसेनेशी कधीही युती करणार नाही, असे आमदार बोदकुरवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत युती करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जातो. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. मात्र स्थानिक स्तरावरील सहकार क्षेत्रात आता कधीच शिवसेनेशी युती न करण्याचा संकल्पच त्यांनी यावेळी जाहीर केला. त्यामुळे येत्या काळात भाजप आणि शिवसेना या युतीतील दोन पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर मतभेदाची दरी अधिक रूंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच विविध शासकीय समित्यांवरही आता शिवसेना कार्यकर्त्यांना प्रतिनिधीत्त्व मिळेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली. कारण त्यावर आमदारांच्या शिफारशीवरूनच सदस्यांची नियुक्ती केली जाते.