वणी : दिवाळी सणाला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे़ यानिमित्त बाजारात विविध साहित्य व शुभेच्छापत्रांची दुकाने सजते. मात्र आता मोबाईलच्या जमान्यात एसएमएसचा काळ असल्याने शुभेच्छापत्रांची क्रेझ मंदावली आहे.पूर्वी सणानिमित्त विविधरंगी शुभेच्छापत्रे खरेदी करून ती आप्त-स्वकीय, मित्र-मैत्रीणींना पाठविण्यात येत होत्ी. दिवाळीला तर शुभेच्छापत्रांच्या दुकानात ग्राहकांची प्रचंड वर्दळ दिसत होती़ मात्र आता मोबाईलच्या वापरामुळे एसएमएसच्या आगमनाने शुभेच्छापत्रांची के्रझ कमी होताना दिसत आहे़ आता केवळ मोजक्याच युवकांचा शुभेच्छापत्रांकडे कल असतो. नक्षीदार कलाकुसरीने तयार शुभेच्छापत्रांचे युवकांमधील आकर्षण दिवसेंदिवस कमी होत आहे़ केवळ ‘व्हॅलेंन्टाईन डे’लाच शुभेच्छापत्रांचा खप मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एका व्यावसायीकाने सांगितले.आता मोबाईलवर किमान एक रूपयामध्ये शुभेच्छांचा एसएमएस पाठविता येतो. त्यामुळे सर्वांनीच आता एसएमएसला पहिली पसंती दिली आहे़ कमी खर्चात जास्त जणांना दिवाळीच्या शुभेच्छा जात असल्याने एसएमएसची के्रझ प्रचंड वाढली आहे़ तसेच सोशल नेटवर्क, फेसबुकवर तर दररोज अॅडव्हांस शुभेच्छांचा वर्षाव होतो. फेसबुकवर एसएमएसचे दर लागत नसल्याने सवर््च फेसबुकवर आपापल्या पध्दतीने शुभेच्छा देतात. शुभेच्छापत्रांची डिझाईन मोबाईलवर तयार करून किंवा इंटरनेटवरील शुभेच्छापत्र डाऊलनोड करून युवक ते फेसबुकवर अपलोड करतात. त्यातूनच सर्व फेसबुक फे्रन्ड्सना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात येतात. त्यामुळे आपसुकच शुभेच्छापत्रांना अखेरची घरघर लागल्याचे दिसून येत आहे़पूर्वी शुभेच्छापत्रांना मोठ्या प्रमाणात मागणी होती़ ५०० रूपयांच्यावर बाजारात ती उपलब्ध आहे़ आताही विविध कलाकुसरींची शुभेच्छापत्रे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे़ आधुनिक युगानुसार लाईट्स व दीपावलीचे संगीतही शुभेच्छापत्रात वाजू लागले आहे़ मात्र तरीही या दुकानांकडे ग्राहकांची गर्दी कमीच दिसून येत आहे़ त्यामुळे भविष्यात शुभेच्छापत्र राहणार की हद्दपार होणार, हे आता सांगणे कठीण झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
दिवाळीच्या शुभेच्छापत्रांची क्रेझ मंदावली
By admin | Updated: October 15, 2014 23:25 IST