शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रमजानच्या पर्वावर बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:26 IST

इस्लाम धर्माचे सर्वात मोठे पर्व रमजानचे आहे. यामध्ये रमजान ईदला सर्वाधिक महत्व आहे. या पर्वाकरिता शहराची बाजारपेठ सजली आहे. या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे.

ठळक मुद्दे१९९५ पासून अविरत ‘सहेरी’चा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : इस्लाम धर्माचे सर्वात मोठे पर्व रमजानचे आहे. यामध्ये रमजान ईदला सर्वाधिक महत्व आहे. या पर्वाकरिता शहराची बाजारपेठ सजली आहे. या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे.शहरासोबत संपूर्ण जिल्ह्यात ईदची तयारी मोठ्या उत्साहात झाली आहे. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत मोठे गर्दी उसळली होती.शहरातील प्रत्येक मशिदीमध्ये रमजान महिन्यात विशेष नमाज नियमित अदा करण्यात आली. या महिन्यात रोजा ठेवण्यात आला. रात्री तरावीहची नमाज, कुरान तिलावत करण्यात आली.सामंजस्य आणि विश्वशांतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करण्यात आली. जकात, दानधर्म, ईश्वराचे आभार, आदी गोष्टींना प्राधान्य देण्यात येते. एकंदरीत पुण्यकार्य करण्याला प्राधान्य देण्यात येते. यामुळे या महिन्याला नेकी और इबादतचा महिना म्हणूनही संबोधले जाते. या महिन्यात कुरानचे पठण करण्याला सर्वाधिक महत्व देण्यात आले आहे.१९९५ पासून अविरत ‘सहेरी’चा उपक्रमरमजानमध्ये उपवास करताना सूर्योदयापूर्वी अन्न ग्रहण केले जाते. दिवसभर उपवास केला जातो. त्याला रोजा असे म्हटले जाते. यवतमाळात मुस्लिम बांधवांनी सहेरीचे आयोजन केले आहे. या ठिकाणी बाहेर ठिकाणावरून येणाऱ्या बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते. १९९५ पासून हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जातो. यासाठी सर्वच समाज बांधवांचे मोलाचे योगदानही मिळते. कळंब चौकातील शाहीन हॉलमध्ये सहेरीचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी शेकडो समाजबांधव अहोरात्र झटत आहेत. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहेरी कमेटीचे अध्यक्ष सैयद नदीम सैयद रियाज, उपाध्यक्ष नवेद अहेमद, सचिव सै. असरार, सै. नूर, संचालक अफजल मोहम्मद अकबर, फैसल बेग, अनिस मम्मा, शकिल अहमद यांच्यासह अनेक जण काम करीत आहेत.