शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

पुसद शहरामध्ये कोरोना चाचणीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:00 IST

एकाचवेळी सर्वजण आल्याने गर्दी झाली होती. आरोग्य कर्मचारी व पोलीस त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगबाबत ओरडून सांगत होते. मात्र त्यांचे काहीच चालले नाही. या सभागृहात तीन दिवसात ६१३ टेस्ट झाल्या. त्यात ३३ जण पॉझिटिव्ह आढळले. आता अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ९१, तर एकूण बाधीत ३१0 झाले.

ठळक मुद्देसभागृहात झुंबड : फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा, जनजागृती करूनही उदासीनता कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले आहे. नागरिकांनी येथील देवराव पाटील चोंढीकर सभागृहात अ‍ॅन्टीजन टेस्टसाठी एकच गर्दी केली आहे.कोरोनाचे लवकर निदान व्हावे म्हणून येथे अ‍ॅन्टीजन टेस्ट सुरू झाली. शिवाजी विद्यालयाच्या देवराव पाटील सभागृहात चाचणी सुरू आहे. या चाचणीसाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. शनिवारी अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये १३ तर आरटीपीसी टेस्टमध्ये १६ आणि रविवारी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे देवी वॉर्ड, उदासी वॉर्ड, गणेश वॉर्ड, सुभाष वॉर्ड, मोतीनगर, व्यंकटेशनगर, नवीन पुसद, महात्मा फुले वॉर्ड आणि तालुक्यातील पार्डी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील संशयितांना येथील विद्यालयाच्या सभागृहात पाचारण केले होते. एकाचवेळी सर्वजण आल्याने गर्दी झाली होती. आरोग्य कर्मचारी व पोलीस त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगबाबत ओरडून सांगत होते. मात्र त्यांचे काहीच चालले नाही. या सभागृहात तीन दिवसात ६१३ टेस्ट झाल्या. त्यात ३३ जण पॉझिटिव्ह आढळले. आता अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ९१, तर एकूण बाधीत ३१0 झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या